lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विजयादशमीला सोने लुटण्याची ‘सुवर्ण’संधी; सोने २०० तर चांदी ५०० रुपयांनी स्वस्त

विजयादशमीला सोने लुटण्याची ‘सुवर्ण’संधी; सोने २०० तर चांदी ५०० रुपयांनी स्वस्त

६२ हजार रुपयांपर्यंत सोने, तर ७५ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत चांदीचे दर दिवाळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 06:00 AM2023-10-24T06:00:17+5:302023-10-24T06:02:01+5:30

६२ हजार रुपयांपर्यंत सोने, तर ७५ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत चांदीचे दर दिवाळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

gold is cheaper by rs 200 and silver by rs 500 on vijayadashami dasara | विजयादशमीला सोने लुटण्याची ‘सुवर्ण’संधी; सोने २०० तर चांदी ५०० रुपयांनी स्वस्त

विजयादशमीला सोने लुटण्याची ‘सुवर्ण’संधी; सोने २०० तर चांदी ५०० रुपयांनी स्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या पूर्वसंध्येला सोने २०० रुपयांनी स्वस्त होत ६१, ४०० रुपये प्रतितोळ्यावर, तर चांदीच्या भावात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७३,५०० रुपये प्रतिकिलोवर आली. यामुळे विजयादशमीला सोने लुटण्याची ‘सुवर्ण’संधी साधली जाणार आहे.

सोन्याच्या किमती का वाढणार?

-सण तसेच लग्नसराईमुळे देशभरात मागणीत वाढ
-इस्रायल-हमास युद्ध वाढत जाण्याची भीती 
-अमेरिका व्याजदरात वाढ करणे थांबविण्याची आशा
-शेअर बाजारातील घसरणीमुळे साेन्याला भाव

दर काय?

सोने ६१,४०० रुपये (प्रति १० ग्रॅम)
चांदी ७३,५०० रुपये (प्रतिकिलो)

६२ हजार रुपयांपर्यंत सोने, तर ७५ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत चांदीचे दर दिवाळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

८ लाख कोटी बुडाले

पश्चिम आशियातील युद्धसंकटामुळे जगभरातील बाजार कोसळले असून, त्याचा फटका भारतीय बाजारालाही बसला. भारतीय शेअर बाजार सोमवारी ८२५ अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ८ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

 


 

Web Title: gold is cheaper by rs 200 and silver by rs 500 on vijayadashami dasara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.