Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today MCX: कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरमध्ये आलेली मजबुती यामुळे २७ एप्रिल २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:19 IST2026-04-27T11:14:34+5:302026-04-27T11:19:21+5:30

Gold Silver Price Today MCX: कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरमध्ये आलेली मजबुती यामुळे २७ एप्रिल २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?

Gold and silver prices fall 27 april 2026 Gold below Rs 153000 check the latest rate in your city before buying | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today MCX: कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरमध्ये आलेली मजबुती यामुळे २७ एप्रिल २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोमवारी बाजार उघडल्यानंतर सोन्याचा भाव १,५२,६४० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४३,७०७ रुपये प्रति किलोवर आला आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यानं या घसरणीमुळे सामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, गुंतवणूकदारांच्या नजरा २९ एप्रिल २०२६, बुधवार रोजी होणाऱ्या अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या बैठकीकडे लागल्यात.

दरांमध्ये किती घसरण?

गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, शुक्रवार २४ एप्रिल रोजी MCX वर सोन्याचा भाव १,५३,७९९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४४,३२१ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. मागील बंद भावाच्या तुलनेत सोनं १,१५९ रुपयांनी तर चांदी ६१४ रुपयांनी स्वस्त झाली आहे. बाजाराची सध्याची स्थिती पाहता घसरणीचा हा कल कायम राहण्याचे संकेत मिळताहेत.

शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले

मध्य-पूर्व तणावाचा परिणाम

इराणनं अमेरिकेला युद्ध संपवण्यासाठी एक नवीन प्रस्ताव पाठवलाय. जर या प्रस्तावावर चर्चा पुढे सरकली तर बाजारातील परिस्थिती बदलू शकते. पश्चिम आशियातील तणाव निवळल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत घट होऊ शकते, ज्यामुळे सोन्या-चांदीवर वाढलेला दबाव कमी होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांचं मत काय?

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे कमोडिटी अँड करन्सी रिसर्चचे उपाध्यक्ष प्रणव मेर यांच्या मते, सोन्या-चांदीच्या किमतींवरील दबाव हा अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चेचे अपडेट्स आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतारांवर अवलंबून असेल. याशिवाय, बुधवारपासून अमेरिकन फेड रिझर्व्ह बँकेची दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. उच्च महागाईमुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी आहे, ज्याचा परिणाम कमोडिटी मार्केटवर दिसून येत आहे.

काय आहेत नवे दर?

शहर२४ कॅरेट२२ कॅरेट१८ कॅरेट
दिल्ली₹1,54,570₹1,41,700₹1,15,870
मुंबई₹1,54,420₹1,41,550₹1,15,820
कोलकाता₹1,54,420₹1,41,550₹1,15,820
चेन्नई₹1,54,900₹1,41,990₹1,18,490
बंगळुरू₹1,54,420₹1,41,550₹1,15,820

आजचे चांदीचे दर

दिल्ली, मुंबई, कोलकाता, भोपाळ, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये आज एक किलो चांदीचा भाव २,५९,९०० रुपये झाला आहे. तर चेन्नईमध्ये चांदीची किंमत २,७०,००० रुपये प्रति किलो इतकी आहे.

Web Title : सोना-चांदी के दामों में गिरावट; खरीदने से पहले नवीनतम दरें जांचें।

Web Summary : कच्चे तेल की कीमतों में वृद्धि और डॉलर में मजबूती के कारण सोना और चांदी की कीमतों में गिरावट आई। एमसीएक्स पर सोना ₹1,52,640 प्रति 10 ग्राम, चांदी ₹2,43,707 प्रति किलो है। अमेरिकी फेडरल रिजर्व की बैठक पर निगाहें टिकी हैं।

Web Title : Gold, silver prices decline; check latest rates before buying.

Web Summary : Gold and silver prices fell due to rising crude oil prices and a stronger dollar. Gold is ₹1,52,640 per 10 grams, silver ₹2,43,707 per kg on MCX. Eyes are on the US Federal Reserve meeting.