lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने पुन्हा ६७ हजारी! ७ दिवसांत १ हजाराने वाढ

सोने पुन्हा ६७ हजारी! ७ दिवसांत १ हजाराने वाढ

दरवाढीच्या शक्यतेने ग्राहकांची पावले पुन्हा सराफा बाजाराकडे वळली आहेत. भाव ७० हजारांवर जाण्याचे संकेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 07:48 AM2024-03-28T07:48:50+5:302024-03-28T07:49:42+5:30

दरवाढीच्या शक्यतेने ग्राहकांची पावले पुन्हा सराफा बाजाराकडे वळली आहेत. भाव ७० हजारांवर जाण्याचे संकेत आहेत.

Gold again 67 thousand! 1 thousand increase in 7 days | सोने पुन्हा ६७ हजारी! ७ दिवसांत १ हजाराने वाढ

सोने पुन्हा ६७ हजारी! ७ दिवसांत १ हजाराने वाढ

नागपूर : सात दिवसांनंतर नागपुरात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर पुन्हा ६७ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम बुधवारी देशांतर्गत झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरवाढीच्या शक्यतेने ग्राहकांची पावले पुन्हा सराफा बाजाराकडे वळली आहेत. भाव ७० हजारांवर जाण्याचे संकेत आहेत.

२० मार्चला शुद्ध सोन्याचे दर ६६ हजारांवर होते. २१ मार्चला खुलत्या बाजारात तब्बल १२०० रुपयांची वाढ होऊन भाव ६७,२०० रुपयांवर गेले. २२ मार्चला भाव पुन्हा ६६,५०० रुपयांवर स्थिरावले. २३ मार्चला भाव पुन्हा १०० रुपयांनी घसरले. २३ आणि २४ मार्चला देशात सराफा बाजारात व्यवहार झाले नाहीत.

मात्र, २६ मार्चला सकाळच्या सत्रात भाव २०० रुपयांनी वाढून  सायंकाळी ६६,९०० रुपयांपर्यंत वाढले. २७ मार्चला सकाळी सोने १०० रुपयांनी कमी होऊन ६६,८०० रुपये आणि सायंकाळी २०० रुपयांनी वाढून ६७ हजारांची पातळी गाठली. २२ कॅरेट सोन्याचे भाव ६२,३०० रुपयांपर्यंत वाढले.

Web Title: Gold again 67 thousand! 1 thousand increase in 7 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.