lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पहिला जिओचा नंबर! जिओकडे सर्वाधिक ३८% वाटा, युजर्संची संख्या तब्बल...

पहिला जिओचा नंबर! जिओकडे सर्वाधिक ३८% वाटा, युजर्संची संख्या तब्बल...

पटकावले अव्वल स्थान; दूरसंचार नियामक संस्था ट्रायने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 07:02 AM2018-08-30T07:02:44+5:302018-08-30T07:03:47+5:30

पटकावले अव्वल स्थान; दूरसंचार नियामक संस्था ट्रायने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात

First place number! The world's largest share of 38%, the number of users ... | पहिला जिओचा नंबर! जिओकडे सर्वाधिक ३८% वाटा, युजर्संची संख्या तब्बल...

पहिला जिओचा नंबर! जिओकडे सर्वाधिक ३८% वाटा, युजर्संची संख्या तब्बल...

नवी दिल्ली : केवळ ४ जी सेवा आणि अत्यंत स्वस्त दर यामुळे रिलायन्स जिओ ही भारतातील प्रथम क्रमांकाची डेटा सेवादाता कंपनी बनली आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर आणि बीएसएनएल या जुन्या कंपन्यांना जिओने मागे टाकले आहे.

दूरसंचार नियामक संस्था ट्रायने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात ४९४ दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत. त्यात जिओचा वाटा सर्वाधिक ३७.७ टक्के आहे. मार्च २0१८ अखेरीस जिओची ग्राहक संख्या १८६.५ दशलक्ष होती. जिओची सेवा सप्टेंबर २0१६मध्ये सुरू झाली. ९0च्या दशकाच्या अखेरीस सुरू झालेल्या एअरटेलचा बाजार हिस्सा २३.५ टक्के आहे. एअरटेलची इंटरनेट सेवा ग्राहक संख्या ११६ दशलक्ष आहे. एअरटेलकडे २ जी ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. हे ग्राहक प्रामुख्याने बिगर-इंटरनेटचा फिचर फोन वापरतात. केवळ व्हॉईस कॉलसाठीच हे फोन वापरले जातात. विलीनीकरणाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर यांचा एकत्रित इंटरनेट बाजार हिस्साही जिओच्या खूपच मागे आहे. व्होडाफोनचा हिस्सा १५.४ टक्के (७६ दशलक्ष ग्राहक) आणि आयडियाचा ९.५ टक्के (४७ दशलक्ष ग्राहक) आहे. सरकारी मालकीच्या बीएसएनएलची उपस्थिती दिल्ली, मुंबई वगळता देशभर आहे. तरीही कंपनीचा बाजार हिस्सा अवघा ६.४ टक्के आहे. ३१.४ दशलक्ष ग्राहकांसह कंपनी इंटरनेट सेवेत पाचव्या स्थानी आहे.

डबल सिमकार्डचा ट्रेंड पथ्यावर
सूत्रांनी सांगितले की, ४ जी सेवेबरोबरच स्वस्त हॅण्डसेट देण्याची योजना राबविल्यामुळे जिओला लाभ झाला आहे.

दोन सिमकार्ड वापरण्याची नागरिकांची मानसिकताही जिओच्या पथ्यावर पडली आहे. आपले एक जुने सिमकार्ड कायम ठेवून ग्राहकांनी दुसरे कार्ड जिओचे निवडले.

Web Title: First place number! The world's largest share of 38%, the number of users ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.