lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इएसआयसी सदस्यांना मिळणार बेकारी भत्ता, मोदी सरकारचा निर्णय

इएसआयसी सदस्यांना मिळणार बेकारी भत्ता, मोदी सरकारचा निर्णय

तीन महिने वेतनाच्या निम्मी रक्कम बेकारी भत्ता म्हणून देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:32 AM2020-08-22T02:32:49+5:302020-08-22T02:33:03+5:30

तीन महिने वेतनाच्या निम्मी रक्कम बेकारी भत्ता म्हणून देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे.

ESIC members to get unemployment allowance, Modi government's decision | इएसआयसी सदस्यांना मिळणार बेकारी भत्ता, मोदी सरकारचा निर्णय

इएसआयसी सदस्यांना मिळणार बेकारी भत्ता, मोदी सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे (इएसआयसी) सदस्य असलेल्यांपैकी ज्यांच्या नोकऱ्या कोरोना साथीच्या काळात गेल्या आहेत, त्यांना तीन महिने वेतनाच्या निम्मी रक्कम बेकारी भत्ता म्हणून देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे. त्याचा सुमारे ४० लाख कामगारांना फायदा होण्याची शक्यता आहे.
कोरोना साथीमुळे २४ मार्च रोजी लॉकडाऊन जारी केला. त्या दिवसापासून ते येत्या ३१ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत ज्यांच्या नोकºया जातील किंवा गेल्या असतील त्यांना हा बेकारी भत्ता मिळणार आहे. असा भत्ता मिळण्यासाठी आवश्यक असलेले पात्रतेबाबतचे नियम केंद्र सरकारने काही प्रमाणात शिथिल केले आहेत. अटल विमा कल्याण योजनेच्या अंतर्गत व इएसआय योजनेचे लाभधारक असलेल्यांना हा बेकारी भत्ता वितरित करण्यात येईल. ही योजना आणखी एक वर्ष म्हणजे ३० जून २०२१ पर्यंत वाढविण्याचे सरकारने ठरविले आहे. २४ मार्च ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी बेकारी भत्त्याबाबतचे पात्रता निकष शिथिल करण्यात आले आहेत. शिथिल केलेल्या नियमांचे ३१ डिसेंबरनंतर परीक्षण करण्यात येईल.
।नियम केले शिथिल
इएसआयसीचा सदस्य आता आपण बेकार असल्याची बाब थेट इएसआयसीला कळवू शकेल. यापूर्वी ही गोष्ट त्या सदस्याने पूर्वी जिथे काम करत होता त्या कंपनीद्वारे कळविणे बंधनकारक होते. आता हा बेकारी भत्ता नोकरी गेलेल्या माणसाच्या थेट बँकखात्यात जमा होणार आहे.

Web Title: ESIC members to get unemployment allowance, Modi government's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.