Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या

१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या

Share Market News : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी हा शेअर ९.९७ टक्क्यांनी वधारून १६६ रुपयांवर पोहोचला. सलग दुसऱ्या दिवशी शेअरमध्ये ही वाढ दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 03:20 PM2024-05-24T15:20:42+5:302024-05-24T15:20:57+5:30

Share Market News : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी हा शेअर ९.९७ टक्क्यांनी वधारून १६६ रुपयांवर पोहोचला. सलग दुसऱ्या दिवशी शेअरमध्ये ही वाढ दिसून आली.

Energy company offering 3 free shares on 1 investors jump on shares during record date inox wind ltd | १ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या

१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या

विंड टर्बाइन उत्पादक आयनॉक्स विंड लिमिटेडच्या शेअरमध्ये शुक्रवारी तेजी दिसून आली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी हा शेअर ९.९७ टक्क्यांनी वधारून १६६ रुपयांवर पोहोचला. सलग दुसऱ्या दिवशी शेअरमध्ये ही वाढ दिसून आली. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. मे २०२३ मध्ये हा शेअर २८.४४ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. या तुलनेत या शेअरने वर्षभरात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिलाय.
 

शेअरमध्ये तेजी का?
 

हा शेअर एक्स बोनस तत्त्वावर व्यवहार करत आहे. आयनॉक्स विंडने यापूर्वी बोनस इश्यूची घोषणा केली होती जिथे त्यांनी प्रत्येक शेअरसाठी ३ फ्री शेअर्स जारी केले होते. 'बोनस शेअर्स जारी केल्यानं केवळ भांडवलाचा आधार मजबूत होणार नाही तर आयनॉक्स विंड शेअर्सची लिक्विडिटी देखील वाढेल, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा सहभाग वाढेल,' असं कंपनीनं म्हटलंय.
 

तोट्यातून नफ्यात आली कंपनी
 

आयनॉक्स विंड लिमिटेडला नुकताच २०.३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, तर गेल्या वर्षी १.८ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. मार्च तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वाढून ५६३.०७ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत १९३.८३ कोटी रुपये होते. मार्च तिमाहीत खर्च वाढून ५१२.५० कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ३१२.४३ कोटी रुपये होता. एप्रिलमध्ये हा शेअर २० टक्के आणि फेब्रुवारीत २६ टक्क्यांनी वधारला होता. मे महिन्यातही यात तेजी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

कंपनीला मिळाल्या ऑर्डर
 

गेल्या महिन्यात कंपनीला हिरो फ्युचर एनर्जीजकडून २१० मेगावॅट विंड टर्बाइन जनरेटर पुरवठ्याची ऑर्डर मिळाली होती. आयनॉक्स विंड हा ८ अब्ज डॉलरच्या आयनॉक्सजीएफएल समूहाचा भाग आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या अखेरच्या तिमाहीत अनेक ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर एकूण ऑर्डर बुक सुमारे २.६ गिगावॅटपर्यंत पोहोचल असल्याचं कंपनीनं फेब्रुवारीक एका कॉन्फरन्स कॉलमध्ये म्हटलं.
 

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Energy company offering 3 free shares on 1 investors jump on shares during record date inox wind ltd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.