lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक कर्मचाऱ्यांसाठी सुखद बातमी, प्रत्येक वर्षाला मिळणार १० दिवस 'सरप्राइज' सुट्टी; RBI चा आदेश

बँक कर्मचाऱ्यांसाठी सुखद बातमी, प्रत्येक वर्षाला मिळणार १० दिवस 'सरप्राइज' सुट्टी; RBI चा आदेश

RBI Send vital bank staff on 10-day surprise leave: कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुट्टीच्या कालावधीत संबंधित बँक कर्मचाऱ्याला ईमेलसोडून अन्य फिजिकल, वर्चुअल अशी कोणतीही जबाबदारी देण्यात येणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:17 AM2021-07-10T11:17:02+5:302021-07-10T11:18:45+5:30

RBI Send vital bank staff on 10-day surprise leave: कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुट्टीच्या कालावधीत संबंधित बँक कर्मचाऱ्याला ईमेलसोडून अन्य फिजिकल, वर्चुअल अशी कोणतीही जबाबदारी देण्यात येणार नाही.

Employees in sensitive positions should go on ‘mandatory’ leave: RBI tells banks | बँक कर्मचाऱ्यांसाठी सुखद बातमी, प्रत्येक वर्षाला मिळणार १० दिवस 'सरप्राइज' सुट्टी; RBI चा आदेश

बँक कर्मचाऱ्यांसाठी सुखद बातमी, प्रत्येक वर्षाला मिळणार १० दिवस 'सरप्राइज' सुट्टी; RBI चा आदेश

Highlightsसंवेदनशील पदांवर काम करणाऱ्या प्रत्येकाला वर्षाला १० दिवस सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना न देता दिली जाईल. म्हणजे कर्मचाऱ्याला आश्चर्याचा धक्का दिला जाईल.अनपेक्षित रजा देण्याचे धोरण आखण्याचे आरबीआयचे सर्व बँकांना आदेश

मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. RBI नं जे बँक कर्मचारी संवेदनशील पदांवर काम करतात त्यांना प्रत्येक वर्षाला किमान १० दिवस सरप्राइज सुट्टी देण्याचं घोषित केले आहे. आरबीआयचा हा नवीन नियम शेड्यूल कमर्शियल बँकेशिवाय ग्रामीण विकास बँका, सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

२०१५ च्या सर्कुलरनुसार, जे बँकर्स ट्रेजरी ऑपरेशन, करेंसी चेस्ट, रिस्क मॉडलिंग, मॉडल वैलिडेशनसारख्या विभागात काम करतात त्यांना संवेदनशील मानलं जातं. RBI संवेदनशील पदांबाबत एक लिस्टही जारी करणार आहे. या लिस्टमधील कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी ‘Mandatory Leave’ अंतर्गत १० दिवसांची सुट्टी अचानक दिली जाणार आहे. नियमाप्रमाणे बँकेच्या कर्मचाऱ्यांना ही सुट्टी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक दिली जाईल. आरबीआयनं ग्रामीण विकास बँक आणि सहकारी बँकांनाही पाठवलेल्या सूचनेत जोखीम व्यवस्थापन उपाय(RBI Modified Risk management guidelines) अनपेक्षित रजा देण्याचे धोरण आखण्यास सांगितले आहे.

सुट्टीच्या दिवशी वर्चुअल अथवा फिजिकल कामाची जबाबदारी नसणार

कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुट्टीच्या कालावधीत संबंधित बँक कर्मचाऱ्याला ईमेलसोडून अन्य फिजिकल, वर्चुअल अशी कोणतीही जबाबदारी देण्यात येणार नाही. जोखीम व्यवस्थापन उपायानुसार अनपेक्षित रजा धोरण लागू होईल. ज्यात संवेदनशील पदांवर काम करणाऱ्या प्रत्येकाला वर्षाला १० दिवस सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना न देता दिली जाईल. म्हणजे कर्मचाऱ्याला आश्चर्याचा धक्का दिला जाईल.

Mandatory leave पॉलिसी अपग्रेड

यापूर्वी आरबीआयने २०१५ रोजी याबाबत दिशानिर्देश जारी केले होते. परंतु यात किती दिवसांची सुट्टी असेल याची स्पष्टता नव्हती. आता ही पॉलिसी अपग्रेड करण्यात आली आहे. आरबीआयद्वारे बँकांना संवेदनशील पदांची यादी बनवण्यासाठी आणि वेळोवेळी त्याचा आढावा घेण्यासाठी सांगण्यात आले आहे. यासाठी आरबीआयनं बँकांना ६ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात बँकेतील कर्मचाऱ्यांना १० दिवसांची सरप्राइज सुट्टी मिळणार आहे.

Read in English

Web Title: Employees in sensitive positions should go on ‘mandatory’ leave: RBI tells banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.