lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अर्थव्यवस्थेला ‘बुरे दिन’!, रुपयाची ऐतिहासिक घसरण सुरुच

अर्थव्यवस्थेला ‘बुरे दिन’!, रुपयाची ऐतिहासिक घसरण सुरुच

डॉलरसमोर रुपयाची मंगळवारी ऐतिहासिक घसरण झाली. एका डॉलरची किंमत 70.07 रुपयांवर गेली. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलही महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 06:29 AM2018-08-14T06:29:00+5:302018-08-14T11:16:58+5:30

डॉलरसमोर रुपयाची मंगळवारी ऐतिहासिक घसरण झाली. एका डॉलरची किंमत 70.07 रुपयांवर गेली. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलही महागले

Economy 'bad day', historical loss of rupee; Petrol per liter of 86 rupees | अर्थव्यवस्थेला ‘बुरे दिन’!, रुपयाची ऐतिहासिक घसरण सुरुच

अर्थव्यवस्थेला ‘बुरे दिन’!, रुपयाची ऐतिहासिक घसरण सुरुच

 मुंबई : डॉलरसमोर रुपयाची ऐतिहासिक घसरण मंगळवारीही सुरुच होती. एका डॉलरची किंमत ७०.०७ रुपयांवर गेली. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलही महागले असून, अनेक ठिकाणी पेट्रोल ८६ रुपये लीटरच्या वर गेले आहे. डिझेल ७४ रुपये लीटरच्या दिशेने जात आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात आल्याने सर्वसामान्यांसाठी ‘बुरे दिन’चे चित्र निर्माण झाले आहे.
मोदी सरकारची पाच वर्षे पूर्ण होताना, अर्थातच २०१९ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या की, डॉलर ७० रुपयांवर जाईल, असा अंदाज होता, पण निवडणुकीला आठ
महिने शिल्लक असताना, डॉलर ७० रुपयांवर पोहोचला. याच आठवड्यात तो ७२ वर व त्यानंतर वर्षअखेरीस ८० च्यावर जाण्याची भीती आता व्यक्त होत आहे.
याचा इंधनदरांवर होतो. गेल्या आठवड्यात डॉलर ६८ दरम्यान असताना खनिज तेल ७२.४० डॉलर प्रति बॅरल (१५९ लिटर) होते.
त्या वेळी भारतीय तेल कंपन्यांना ३०.९६ रुपये प्रति लीटरने खनिज तेल खरेदी करावे लागत होते. आता डॉलर ७० च्यावर गेल्यानंतर खनिज
तेलसुद्धा ७२.९५ डॉलर प्रति बॅरल झाले. तेल खरेदी करण्यासाठी आता ३२.४२ रुपये प्रति लीटर मोजावे लागत आहेत. यामुळेच पेट्रोल-डिझेलचे दर भडकतील. डिझेल महागल्याचा परिणाम मालवाहतुकीवर होतो आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग होतात.

रुपया आशियात सर्वाधिक कमकुवत

या वर्षात रुपया आशियातील सर्वाधिक कमकुवत चलन ठरले. पहिल्या ८ महिन्यांत रुपयाच्या मूल्यात ७ टक्के कपात झाली. येत्या काळात तो आणखी कमकुवत होईल, असे दिसते.
- गौरांग सोमय्या, चलन तज्ज्ञ,
मोतिलाल ओस्वाल सेक्युरिटीज

Web Title: Economy 'bad day', historical loss of rupee; Petrol per liter of 86 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.