Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही

SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही

SBI FD Schemes: भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यांवर जबरदस्त परतावा देत आहे. देशातील ही सर्वात मोठी सरकारी बँक वेगवेगळ्या मुदत ठेव खात्यांवर भरघोस व्याज ऑफर करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 14:00 IST2026-05-02T14:00:08+5:302026-05-02T14:00:08+5:30

SBI FD Schemes: भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यांवर जबरदस्त परतावा देत आहे. देशातील ही सर्वात मोठी सरकारी बँक वेगवेगळ्या मुदत ठेव खात्यांवर भरघोस व्याज ऑफर करत आहे.

Deposit rs 200000 in SBI and get a fixed interest of rs 105983 also get a government guarantee | SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही

SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही

SBI FD Schemes: भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यांवर जबरदस्त परतावा देत आहे. देशातील ही सर्वात मोठी सरकारी बँक वेगवेगळ्या मुदत ठेव (FD) खात्यांवर भरघोस व्याज ऑफर करत आहे. स्टेट बँकेमध्ये किमान ७ दिवसांच्या कालावधीसाठी देखील एफडी खातं उघडता येतं. याशिवाय, तुम्ही या बँकेत जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडू शकता. एसबीआय ही एक सरकारी बँक असून त्यावर सरकारचं पूर्ण नियंत्रण असतं, त्यामुळे याच्या सर्व योजनांवर गॅरंटीड परतावा मिळतो.

इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका

किती मिळतंय व्याज?

स्टेट बँक वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी खात्यांवर किमान ३.०५ टक्क्यांपासून ते कमाल ७.१५ टक्क्यांपर्यंत बंपर व्याज देत आहे. व्याजाचे सविस्तर दर खालीलप्रमाणे आहेत:

  • ७ दिवसांची सर्वात कमी मुदत: ३.०५ टक्के ते ३.६५ टक्क्यांपर्यंत व्याज.
  • ४६ दिवस ते १७९ दिवस: ४.९० टक्के ते ५.५० टक्क्यांपर्यंत व्याज.
  • १८० दिवस ते २१० दिवस: ५.६५ टक्के ते ६.२५ टक्क्यांपर्यंत व्याज.
  • ५ वर्षे ते १० वर्षांची प्रदीर्घ मुदत: ६.०५ टक्क्यांपासून ते सर्वाधिक ७.१५ टक्क्यांपर्यंत व्याज.

₹२,००,००० जमा केल्यास किती व्याज?

एसबीआयच्या ६ वर्षांच्या एफडी योजनेत २ लाख रुपये जमा केल्यास मिळणारा परतावा किती असेल ते जाणून घेऊ.

  • सामान्य नागरिक : २ लाख रुपये जमा केल्यास मॅच्युरिटीवर ८६,७४७ रुपयांच्या निश्चित व्याजासह एकूण २,८६,७४७ रुपये मिळतील.
  • ज्येष्ठ नागरिक : ६ वर्षांच्या योजनेत २ लाख रुपये जमा केल्यास मॅच्युरिटीवर एकूण ३,०४,१८४ रुपये मिळतील, ज्यामध्ये १,०४,१८४ रुपयांच्या निश्चित व्याजाचा समावेश आहे.
  • अति ज्येष्ठ नागरिक : ६ वर्षांच्या एफडी योजनेत २ लाख रुपये जमा केल्यास मॅच्युरिटीवर एकूण ३,०५,९८३ रुपये मिळतील, ज्यामध्ये १,०५,९८३ रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे.

Web Title : एसबीआई एफडी: ₹2,00,000 जमा करें और पाएं गारंटीड फिक्स्ड ब्याज

Web Summary : एसबीआई गारंटीड रिटर्न के साथ आकर्षक एफडी योजनाएं पेश करता है। छह साल के लिए ₹2,00,000 जमा करें और वरिष्ठ नागरिक ₹1,05,983 तक ब्याज कमा सकते हैं। ब्याज दरें कार्यकाल के आधार पर 3.05% से 7.15% तक भिन्न होती हैं।

Web Title : SBI FD: Deposit ₹2,00,000 and Earn Guaranteed Fixed Interest

Web Summary : SBI offers attractive FD schemes with guaranteed returns. Deposit ₹2,00,000 for six years and senior citizens can earn up to ₹1,05,983 interest. Interest rates vary from 3.05% to 7.15% depending on the tenure.