lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवसाचं वेतन ७३ लाख, कंपनीचं मार्केट कॅप ५ लाख कोटींपेक्षा अधिक; वाचा अनिरुद्ध देवगण यांची कहाणी

दिवसाचं वेतन ७३ लाख, कंपनीचं मार्केट कॅप ५ लाख कोटींपेक्षा अधिक; वाचा अनिरुद्ध देवगण यांची कहाणी

त्यांनी आपलं शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमधून केलं आणि आयआयटी दिल्लीतून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगचं शिक्षण घेतलं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:28 PM2023-08-16T12:28:11+5:302023-08-16T12:28:39+5:30

त्यांनी आपलं शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमधून केलं आणि आयआयटी दिल्लीतून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगचं शिक्षण घेतलं. 

Daily wage 73 lakhs company s market cap more than 5 lakh crores Read the success story of Anirudh Devgan details | दिवसाचं वेतन ७३ लाख, कंपनीचं मार्केट कॅप ५ लाख कोटींपेक्षा अधिक; वाचा अनिरुद्ध देवगण यांची कहाणी

दिवसाचं वेतन ७३ लाख, कंपनीचं मार्केट कॅप ५ लाख कोटींपेक्षा अधिक; वाचा अनिरुद्ध देवगण यांची कहाणी

पगाराच्या बाबतीत आयटी क्षेत्र सर्वोत्तम मानल जाते. भारत आणि जगातील दिग्गज टेक कंपन्या लाखो आणि कोटींच्या पॅकेजवर दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना कामावर घेतात. टॉप आयटी कंपन्यांमध्ये मॅनेजमेंट लेव्हलपर्यंत पोहोचलेल्या लोकांचा पगार दरवर्षी कोट्यवधींमध्ये असतो. गुगल, मायक्रोसॉफ्टसह अनेक टॉप टेक कंपन्यांमधील भारतीय वंशाच्या सीईओंना कोट्यवधी रुपये पगार मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला एका टेक सीईओबद्दल सांगणार आहोत ज्यांचा रोजचा पगार सुमारे ७२ लाख रुपये आहे.

आम्ही तुम्हाला सांगत आहोत प्रसिद्ध कम्प्युटर सायंटिस्ट आणि आयआयटीचे माजी विद्यार्थी अनिरुद्ध देवगन यांच्याबाबत. अनिरुद्ध देवगन हे दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी कॅडेंस डिझाईन सिस्टम्सचे सीईओ आहेत. या कंपनीचं मार्केट कॅप ५,१७,००० कोटी रुपये (६२.१४ बिलियन डॉलर्स) पेक्षा अधिक आहे.

वडील होते प्राध्यापक
अनिरुद्ध देवगण यांचं बालपण आयआयटीच्या वातावरणातच गेलं. ते आयआयटी परिसरातच लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपलं शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमधून (DPS) केलं आणि आयआयटी दिल्लीतून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगचं शिक्षण घेतलं. 

यानंतर अनिरुद्ध देवगण हे अमेरिकेला गेले. त्या ठिकाणी त्यांनी कार्नेंगी मेलॉन युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये मास्टर आणि पीएचडी केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दिग्गज आयटी कंपनी आयबीएमपासून केली. या ठिकाणी त्यांनी एका दशकापेक्षा अधिक सेवा दिली. यानंतर त्यांनी मॅग्मा डिझाईन ऑटोमेशनमध्ये ६ वर्षे नोकरी केली.

२०१७ मध्ये टर्निंग पॉईंट
यानंतर अनिरुद्ध देवगण यांनी २०१७ मध्ये कँडेस जॉईन केलं. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांना संचालक मंडळात सहभागी करुन घेण्यात आलं आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर अनिरुद्ध देवगण हे टॉप टेक सीईओ सत्य नडेला, सुंदर पिचाई, जयश्री उल्ला सारख्या दिग्गजांमध्ये सामील झाले. \

२२०० कोटींचं सॅलरी पॅकेज
जेव्हा अनिरुद्ध देवगण हे सीईओ बनले तेव्हा त्यांना मूळ वेतनाच्या १२५ टक्के टार्गेट बोनस, सोबतच ७,२५,००० डॉलर्सचं मूळ वेतन देण्यात आलं. त्यांना १५ मिलियन डॉलर्स मूल्याच्या बरोबन प्रमोशन अनुदान स्टॉक पर्याय देण्यात आला. २०२१ मध्ये देवगण यांना प्रतिष्ठित कॉफमॅन पुरस्कार देण्यात आला.

salary.com नुसार २०२२ मध्ये कँडेंसचे चेअरमन आणि सीईओंच्या रुपात त्यांचं वार्षिक वेतन ३२,२१६,०३४ डॉलर्स म्हणजे २ अब्ज ६८ लाख रुपये होतं. जर हे मोजलं तर त्यांचं दिवसाचं वेतन ७३ लाख रुपये होतं.

Web Title: Daily wage 73 lakhs company s market cap more than 5 lakh crores Read the success story of Anirudh Devgan details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.