lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > coronavirus : कोरोनामुळे शेअर बाजारात हाहाकार, सेंसेक्स तीन हजार अंकांनी कोसळला

coronavirus : कोरोनामुळे शेअर बाजारात हाहाकार, सेंसेक्स तीन हजार अंकांनी कोसळला

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे भागधारकांकडून समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 12:11 PM2020-03-23T12:11:11+5:302020-03-23T12:13:14+5:30

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे भागधारकांकडून समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागली आहे.

coronavirus: Sensex collapses by more then 3,000 points BKP | coronavirus : कोरोनामुळे शेअर बाजारात हाहाकार, सेंसेक्स तीन हजार अंकांनी कोसळला

coronavirus : कोरोनामुळे शेअर बाजारात हाहाकार, सेंसेक्स तीन हजार अंकांनी कोसळला

मुंबई - देशात कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होऊ लागल्यापासून त्याचा विपरित परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे भागधारकांकडून समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागली आहे. त्यामुळे आज आतापर्यंतच्या कारभारात मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील सूचकांक तीन हजारांहून अधिक अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा सूचकांक असलेला निफ्टीसुुद्धा मोठ्या प्रमानावर  आहे.

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या प्रश्नामुळे अनेक उद्योगधंदे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, आज कोरोना विषाणूच्या सावटाखालीच शेअर बाजारात व्यवहारांना सुरुवात झाली. दरम्यान, दिवसाच्या सुरुवातीलाच सेंसेक्स 2307.16 अंकांनी कोसळला. तर तर निफ्टी 8.66 टक्क्यांनी कोसळला. शेअर बाजारातील 150 शेअर्सनी लोअर सर्किट गाठले. त्यामुळे शेअर बाजारातील व्यवहार काही काळ बंद ठेवण्यात आले होते.

अर्ध्या तासानंतर बाजारात पुन्हा सुरू झाल्यावर शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी पडझड झाली. त्यामुळे 3149.86 अंकांनी घसरून 26 हजार 766.10 पर्यंत खाली आला, तर निफ्टी 7945.70 अंकांपर्यंत खाली आला.

Web Title: coronavirus: Sensex collapses by more then 3,000 points BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.