Lokmat Money > बिझनेस न्यूज > CoronaVirus : सोन्याच्या भावात मोठी घसरण; चांदीचे दरही १००० रुपयांनी गडगडले; जाणून घ्या आजच्या किमती

CoronaVirus : सोन्याच्या भावात मोठी घसरण; चांदीचे दरही १००० रुपयांनी गडगडले; जाणून घ्या आजच्या किमती

सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदवली गेली असून, चांदीचे भावही गडगडले आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 03:52 PM2020-04-20T15:52:54+5:302020-04-20T15:55:47+5:30

सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदवली गेली असून, चांदीचे भावही गडगडले आहेत...

CoronaVirus : Gold prices today fall, down ₹1,800 per 10 gram in just 2 days vrd | CoronaVirus : सोन्याच्या भावात मोठी घसरण; चांदीचे दरही १००० रुपयांनी गडगडले; जाणून घ्या आजच्या किमती

CoronaVirus : सोन्याच्या भावात मोठी घसरण; चांदीचे दरही १००० रुपयांनी गडगडले; जाणून घ्या आजच्या किमती

नवी दिल्लीः लॉकडाऊन काळात मल्टी कमॉडिटी बाजारातही सोने-चांदीच्या भावात घसरण सुरूच असून, सोमवार २० एप्रिल रोजी सोन्याच्या भावात १६५० रुपयांची तर चांदीत १००० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ४५ हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर, तर चांदी ४२ हजार ८०० रुपये प्रतिकिलोवर आली. यापूर्वी १६ एप्रिल रोजी ४७ हजार २५० रुपयांवर पोहोचलेल्या सोन्याच्या भावात १७ रोजी ११०० रुपयांनी घसरण होऊन सोने ४६ हजार १५० रुपये प्रति तोळ्यावर आले होते, तर चांदीतदेखील ७०० रुपयांची घसरण होऊन ती ४४ हजार ५०० रुपयांवरून ४३ हजार ८०० रुपये प्रतिकिलोवर आली होती.

कोरोनामुळे गेल्या महिना-दीड महिन्यांपासून सोने-चांदीच्या भावावर मोठा परिणाम होत आहे. त्यात आता लॉकडाऊनमुळे सुवर्ण पेढ्या बंद आहेत. असे असले तरी  मल्टी कमॉडिटी बाजार सुरूच आहे. त्यामुळे त्यात दररोज मोठे सौदे होत आहेत. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच व्यवहारांवर परिणाम होत आहे. त्यात सोमवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीत घसरण झाली. त्यामुळे कमॉडिटी बाजारात  ४७ हजार २५० रुपयांवर असलेल्या सोन्याचे भाव सोमवारी ४५ हजार ६०० रुपयांवर आले.


या सोबतच चांदीतही १००० रुपयांनी घसरण झाली. ४३ हजार ८०० रुपयांवर असलेली चांदी ४२ हजार ८०० रुपयांवर आली. या पूर्वी १७ एप्रिल रोजी चांदीत ७०० रुपयांची घसरण होऊन ती ४४ हजार ५०० रुपयांवरून ४३ हजार ८०० रुपये प्रतिकिलोवर आली होती.
 

Web Title: CoronaVirus : Gold prices today fall, down ₹1,800 per 10 gram in just 2 days vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.