lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बांधकाम क्षेत्रातील 'ही' दिग्गज कंपनी ७००० कोटींचा IPO आणण्याच्या तयारीत, SEBI कडे केला अर्ज

बांधकाम क्षेत्रातील 'ही' दिग्गज कंपनी ७००० कोटींचा IPO आणण्याच्या तयारीत, SEBI कडे केला अर्ज

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक दिग्गज कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात आले आहेत. या आयपीओंनी अनेक गुंतवणूकदारांना मालामालही केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 02:59 PM2024-03-29T14:59:36+5:302024-03-29T15:00:20+5:30

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक दिग्गज कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात आले आहेत. या आयपीओंनी अनेक गुंतवणूकदारांना मालामालही केलंय.

Construction giant Shapoorji Pallonji Group company has filed with SEBI gearing up for a Rs 7000 crore IPO | बांधकाम क्षेत्रातील 'ही' दिग्गज कंपनी ७००० कोटींचा IPO आणण्याच्या तयारीत, SEBI कडे केला अर्ज

बांधकाम क्षेत्रातील 'ही' दिग्गज कंपनी ७००० कोटींचा IPO आणण्याच्या तयारीत, SEBI कडे केला अर्ज

Shapoorji Pallonji Group company: गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक दिग्गज कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात आले आहेत. या आयपीओंनी अनेक गुंतवणूकदारांना मालामालही केलंय. परंतु आता शापूरजी पालोनजी समूहानं Afcons Infra IPO साठी डीआरएचपी दाखल केल्याची माहिती समोर आलीये. जेव्हा एखाद्या कंपनीला आयपीओ दाखल करायचा असतो, तेव्हा त्यांना सेबीकडे डीआरएचपी दाखल करावा लागतो.  सीएनबीसी टीव्ही-१८ च्या रिपोर्टनुसार, Afcons Infra IPO ची साईज ७००० कोटी रुपये असू शकते.
 

रिपोर्ट्सनुसार, शापूरजी पालोनजी ग्रुप कंपनीच्या आयपीओमधील शेअर्स फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले जातील. Afcons Infra फॉल सेल ऑफरद्वारे सुमारे १२०० कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करू शकते. त्याच वेळी, शापूरजी पालोनजी समूह आयपीओद्वारे आपला हिस्सा विकून ५७५० कोटी रुपये उभे करू शकतो. आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार Afcons Infra मध्ये शापूरजी पालोनजी समूहाचा एकूण ९९.४८ टक्के हिस्सा आहे. रिपोर्टनुसार आयपीओसाठी Afcons Infra चं मूल्यांकन १९००० ते २०००० कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. 
 

फंड जमा करण्याचा प्रयत्न
 

गेल्या काही काळापासून शापूरजी पालोनजी समूह फंड जमवण्याचा प्रयत्न करत आहे. नुकताच गोपालपूर पोर्ट्स अदानी समूहाला विकण्यात आला. यातून समूहाला ३००० कोटी रुपये मिळाले. यापूर्वी डिसेंबर महिन्यात ७१० कोटींमध्ये धरमतर पोर्ट जेएसडब्ल्यू इन्फ्राला विकण्यात आला होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Construction giant Shapoorji Pallonji Group company has filed with SEBI gearing up for a Rs 7000 crore IPO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.