Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान उत्साहात

जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान उत्साहात

अकोला: केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार जिल्ह्यातील विविध शाळा, विद्यालय, संस्था, शासकीय कार्यालये व ग्रामपंचायतींद्वारे १४ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST2014-11-22T23:30:14+5:302014-11-22T23:30:14+5:30

अकोला: केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार जिल्ह्यातील विविध शाळा, विद्यालय, संस्था, शासकीय कार्यालये व ग्रामपंचायतींद्वारे १४ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.

Cleanliness drive in the district | जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान उत्साहात

जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान उत्साहात

ोला: केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार जिल्ह्यातील विविध शाळा, विद्यालय, संस्था, शासकीय कार्यालये व ग्रामपंचायतींद्वारे १४ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.
वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील जागेश्वर कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत ३,२०० विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक सुनील मसने, संस्थेचे अध्यक्ष संतोष मानकर, उपमुख्याध्यापक अविनाश शिंदे, कैलास ताडे, गोपाल मानकर, गटशिक्षणाधिकारी फुंडकर सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी विद्यार्थी व शिक्षकांनी हातात खराटे घेऊन गावातील रस्त्यांची स्वच्छता केली. 20सीटीसीएल33 व 34
------
मूर्तिजापूर: स्थानिक मूर्तिजापूर हायस्कूलच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जनजागृती रॅली काढली. मूर्तिजापूर पोलिस ठाण्याचा परिसर स्वच्छ केल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. ठाणेदार अनिल ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी, हायस्कूलचे पर्यवेक्षक सुरेंद्र देशमुख यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
-------
बाळापूर: येथील गुजराथीपुरा भागातील न. प. प्रा. मराठी शाळा क्र. ११ यांच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मो. जमीर मो. इब्राहिम, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष किशोरचंद्र गुजराथी, मुख्याधिकारी मनोहर आकोटकर, मो. अक्रम, मोहन धरमठोक, पप्पुसेठ गुजराथी उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-------
शिवणी: येथील अंगणवाडी केंद्र क्रं ५ मध्ये पर्यवेक्षिका कल्पना गिरी यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिसर स्वच्छ केला. सरपंच उषा मुरुमकार, रमीजाबी शे. साबीर, शिक्षिका वंदना बोर्डे, संगीता खंडारे, वनमाला गोपनारायण यांच्यासह शोभा घायवट, प्रतिभा यादव, रेखा डोंगरे, तारा बेलखेडे, रेखा वानखडे, शीतल राऊत, संगीता मोहोड, रेखा मोहोड, संगीता सराटे, नंदा तायडे उपस्थित होते.
-------
ब्रšाी खुर्द: येथील अंगणवाडी, जि.प. उर्दू शाळा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सरपंच पुष्पा उमाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास समाधान इंगळे, केंद्रप्रमुख कैलास सोळंके, इंदू जामनिक, वर्षा इंगळे, ऊर्मिला भालेराव, ज्योती भालेराव, प्रतिभा भालेराव, शांता सुर्वे, पद्मा सुभेदार, भारती गायकवाड, अश्विनी जामनिक, विशाखा इंगळे यांची उपस्थिती होती.

Web Title: Cleanliness drive in the district