Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सीडीसाठी-निवडणुकीचा बिगुल वाजला; काँग्रेसमध्ये प्रक्रिया सुरू ३१ डिसेंबरपर्यंत सदस्य नोंदणीची मुदत

सीडीसाठी-निवडणुकीचा बिगुल वाजला; काँग्रेसमध्ये प्रक्रिया सुरू ३१ डिसेंबरपर्यंत सदस्य नोंदणीची मुदत

आशिष गावंडे/अकोला

By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:03+5:302014-12-02T00:36:03+5:30

आशिष गावंडे/अकोला

CDs-Elections Wrist; The registration process for the Congress will start from December 31 | सीडीसाठी-निवडणुकीचा बिगुल वाजला; काँग्रेसमध्ये प्रक्रिया सुरू ३१ डिसेंबरपर्यंत सदस्य नोंदणीची मुदत

सीडीसाठी-निवडणुकीचा बिगुल वाजला; काँग्रेसमध्ये प्रक्रिया सुरू ३१ डिसेंबरपर्यंत सदस्य नोंदणीची मुदत

िष गावंडे/अकोला
काँग्रेस पक्षांतर्गत असलेल्या प्रदेश, जिल्हा व महानगर स्तरावर फेरबदल करण्यासाठी कार्यकारिणीची नव्याने निवड होणार आहे. याकरिता निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून, सदस्य नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत निि›त करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये ब्लॉक अध्यक्षपदाची निवड केल्यानंतर मे किंवा जून महिन्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल.
काँग्रेसच्या प्रदेश, जिल्हा व महानगर कार्यकारिणीची दर पाच वर्षांनी निवड प्रक्रिया होते. यंदा मे महिन्यात प्रदेश कार्यकारिणीची नव्याने निवड केली जाईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष पदाची निवड ही लोकशाही मार्गाने होण्यासाठी पक्षात सदस्य नोंदणीवर भर देण्यात आला आहे. तसे निर्देश प्रदेश स्तरावरून प्राप्त झाले असून, पावती पुस्तिका रवाना करण्यात आल्या. सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असल्याने पदाधिकार्‍यांमध्ये पावती पुस्तिकेसाठी धावपळ सुरू झाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सदस्य नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १५ जानेवारीला याद्या जाहीर होतील. एका पावती पुस्तिकेनुसार २५ सदस्यांची नोंदणी करणे क्रमप्राप्त असून, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी केल्यानंतर बुथनिहाय अध्यक्षाची निवड केली जाईल. त्यानंतर बुथ अध्यक्षांमधून ब्लॉक अध्यक्षांची निवड पक्षाच्यावतीने नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीत पार पडेल. फेब्रुवारी महिन्यात ब्लॉक अध्यक्षांची निवड केल्यानंतर मे महिन्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल. यामध्ये जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षपदासाठी ब्लॉक अध्यक्ष मतदान करतील.

कोट...
काँग्रेसच्या सदस्य नोंदणीसाठी जिल्हा व महानगर स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निर्देश देण्यात आले आहेत. याकरिता पावती पुस्तिका पाठविण्यात आल्या असून, निवडणुकीच्या पहिल्या व प्राथमिक टप्प्याला सुरुवात झाली आहे.
-गणेश पाटील महासचिव, प्रदेश कार्यकारिणी

Web Title: CDs-Elections Wrist; The registration process for the Congress will start from December 31