Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2021, Air India : टाटांकडून घेतलेली 'एअर इंडिया' सरकार विकणार; 'महाराजा'चं खासगीकरण करणार!

Budget 2021, Air India : टाटांकडून घेतलेली 'एअर इंडिया' सरकार विकणार; 'महाराजा'चं खासगीकरण करणार!

Budget 2021 Government announce to sell Air India : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भारताची सरकारी हवाई वाहतूक सेवा 'एअर इंडिया'चं पूर्णपणे खासगीकरण करणार असल्याची घोषणा केली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 12:23 PM2021-02-01T12:23:19+5:302021-02-01T12:40:39+5:30

Budget 2021 Government announce to sell Air India : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भारताची सरकारी हवाई वाहतूक सेवा 'एअर इंडिया'चं पूर्णपणे खासगीकरण करणार असल्याची घोषणा केली

Budget 2021 Government announce to sell Air India | Budget 2021, Air India : टाटांकडून घेतलेली 'एअर इंडिया' सरकार विकणार; 'महाराजा'चं खासगीकरण करणार!

Budget 2021, Air India : टाटांकडून घेतलेली 'एअर इंडिया' सरकार विकणार; 'महाराजा'चं खासगीकरण करणार!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण  Nirmala Sitharaman यांनी भारताची सरकारी हवाई वाहतूक सेवा 'एअर इंडिया'चं  Air India पूर्णपणे खासगीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे. सरकार आता एअर इंडिया कंपनी विकून टाकणार आहे.  

एअर इंडियावर जवळपास ६० हजार कोटींचं कर्ज असल्यानं सरकारकडून कंपनीच्या विक्रीचा निर्णय होण्याची शक्यता याआधीच वर्तविण्यात आली होती. अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. सीतारामण यांचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी सीतारामाण यांनी विविध क्षेत्रांतील तरतूदींची घोषणा केली. पण या सगळ्यात एअर इंडियाच्या विक्रीच्या घोषणेनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. एअर इंडियाच्या खासगीकराच्या घोषणेनंतर सभागृहात विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

एअर इंडियाची स्थापना नेमकी कशी झाली?
एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये झाली. उद्योगपती जे. आर. डी. टाटांनी स्थापन केलेल्या एअरलाईन्सचं सुरुवातीचं नाव 'टाटा एअरलाईन्स' होतं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारनं टाटा एअरलाईन्सचं राष्ट्रीयकरण केलं. १९५३ मध्ये सरकारनं टाटा एअरलाईन्स ताब्यात घेतली. तिचं नावही बदलण्यात आलं. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी एअर इंडिया आणि देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी इंडियन एअरलाईन्स अशा दोन स्वतंत्र कंपन्या सरकारनं सुरू केल्या.

समस्यांची सुरुवात नेमकी कुठून झाली?
२०११ मध्ये झालेलं विलीनीकरण एअर इंडियाच्या अडचणी वाढवणारं ठरलं. मात्र कंपनीच्या समस्यांना खूप आधीपासूनच सुरुवात झाली होती. आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानांचं अत्याधुनिकीकरण करण्यात एअर इंडिया कमी पडली. २००४ मध्येही एअर इंडियाकडून बी७४७ आणि ए ३१० विमानांचा वापर सुरू होता. कित्येक दशकं कंपनी हीच विमानं वापरत होती. याशिवाय भ्रष्टाचार आणि ढिसाळ व्यवस्थापन यांचा प्रचंड मोठा फटका एअर इंडियाला बसला.

टाटा एअर इंडिया विकत घेणार? 
टाटा एअर इंडिया विकत घेणार असल्याची चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. सिंगापूर एअरलाईन्स आणि टाटा यांची गुंतवणूक विस्तारा या हवाई वाहतूक कंपनीत आहे. टाटा एअर इंडियामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचं समजताच सिंगापूर एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल काळजी व्यक्त केली. 

Web Title: Budget 2021 Government announce to sell Air India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.