Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel आणि Jio चं टेन्शन वाढवायला येतंय BSNL 5G, टेलिकॉम मंत्र्यांनी सांगितलं कधी होणार लाँच

Airtel आणि Jio चं टेन्शन वाढवायला येतंय BSNL 5G, टेलिकॉम मंत्र्यांनी सांगितलं कधी होणार लाँच

रिलायन्स जिओ आणि एअरटेलनं सध्या भारतात 5G सेवांची सुरुवात केली आहे. परंतु आता बीएसएनएलही मागे राहणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 02:43 PM2023-01-08T14:43:50+5:302023-01-08T14:44:07+5:30

रिलायन्स जिओ आणि एअरटेलनं सध्या भारतात 5G सेवांची सुरुवात केली आहे. परंतु आता बीएसएनएलही मागे राहणार नाही.

BSNL 5G migh launch in april 2024 Airtel and Jio 5g services Telecom Minister said when the launch will take place | Airtel आणि Jio चं टेन्शन वाढवायला येतंय BSNL 5G, टेलिकॉम मंत्र्यांनी सांगितलं कधी होणार लाँच

Airtel आणि Jio चं टेन्शन वाढवायला येतंय BSNL 5G, टेलिकॉम मंत्र्यांनी सांगितलं कधी होणार लाँच

रिलायन्स जिओ आणि एअरटेलनं सध्या भारतात 5G सेवांची सुरुवात केली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये या सेवांचा आनंद घेता येणार आहे. परंतु सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलही आता 5G सेवा लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच आपली 5G सेवा लाँच करू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनीदेखील याची पुष्टी केली आहे.   एप्रिल २०२४ पर्यंत बीएसएनएल 5G लाँच केलं जाणार असल्याचं दूरसंचार मंत्र्यांनी सांगितल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. सध्या कंपनी आपल्या 4G सेवांवर लक्ष केंद्रीत करत आहे.

पुढील वर्षी 5G
बीएसएनएल आपलं 4G नेटवर्क लाँच केल्यानंतर एका वर्षाच्या आत 5G अपग्रेड करेल. सध्या कंपनी टीसीएस आणि सी-डॉट यांच्यासोबत मिळून 4G सेवांवर काम करत आहे. सध्या नेटवर्क अपग्रेडेशनचं काम तेजीनं सुरू आहे. कंपनी लवकरच 4G सेवा सुरू करेल, असंच 5G सोबतही होईल, असं दूरसंचार मंत्र्यांनी यापूर्वी म्हटलं होतं.

Web Title: BSNL 5G migh launch in april 2024 Airtel and Jio 5g services Telecom Minister said when the launch will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.