lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBIच्या डेबिट कार्डावरून दिवसाला काढता येणार 20 हजारांहून जास्त रक्कम, पण...

SBIच्या डेबिट कार्डावरून दिवसाला काढता येणार 20 हजारांहून जास्त रक्कम, पण...

स्टेट बँक ऑफ इंडियानं डेबिट कार्ड(क्लासिक)वरून दिवसाला 20 हजार रुपयांहून जास्त पैसे काढण्याची मुभा दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 04:20 PM2018-11-12T16:20:38+5:302018-11-12T16:28:05+5:30

स्टेट बँक ऑफ इंडियानं डेबिट कार्ड(क्लासिक)वरून दिवसाला 20 हजार रुपयांहून जास्त पैसे काढण्याची मुभा दिली आहे.

biz customer can take a card with a higher withdrawal limit from the bank if they need | SBIच्या डेबिट कार्डावरून दिवसाला काढता येणार 20 हजारांहून जास्त रक्कम, पण...

SBIच्या डेबिट कार्डावरून दिवसाला काढता येणार 20 हजारांहून जास्त रक्कम, पण...

Highlightsस्टेट बँक ऑफ इंडियानं डेबिट कार्ड(क्लासिक)वरून दिवसाला 20 हजार रुपयांहून जास्त पैसे काढण्याची मुभा दिलीत्यासाठी तुम्हाला बँकेतून एक विशिष्ट कार्ड घ्यावं लागणार आहे. 1 नोव्हेंबरपासून डेबिट कार्डावरून दिवसाला 20 हजारांची रोख रक्कम काढण्याची मर्यादा घालून देण्यात आली होती.

नवी दिल्ली- स्टेट बँक ऑफ इंडियानं डेबिट कार्ड(क्लासिक)वरून दिवसाला 20 हजार रुपयांहून जास्त पैसे काढण्याची मुभा दिली आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला बँकेतून एक विशिष्ट कार्ड घ्यावं लागणार आहे. एटीएम कार्ड क्लोनिंग करून देशभरातून फसवणुकीच्या घटना वाढल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबरपासून डेबिट कार्डावरून दिवसाला 20 हजारांची रोख रक्कम काढण्याची मर्यादा घालून देण्यात आली होती. तसेच आता 20 हजारांहून जास्त पैसे काढू शकता, अशी माहिती एसबीआयचे एमडी पीके गुप्ता यांनी दिली आहे. आम्ही फसवणूक थांबवण्यासाठी दिवसाला 20 हजार रुपयांची मर्यादा घालून दिली होती. तरीही जे ग्राहक दिवसाला 20 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढू इच्छितात, त्यांनी बँकेतून अधिक पैसे काढता येऊ शकणारं एटीएम कार्ड घ्यावं, असंही पी. के. गुप्तांनी स्पष्ट केलं आहे.


एसबीआयच्या माहितीनुसार, प्लॅटिनम कार्ड ग्राहक एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात. एसबीआयचा ग्राहक बँकेतल्या आता कोणत्याही शाखेत जाऊन पाहिजे तेवढे पैसा जमा करू शकतो. तसेच चालू खात्यातील ग्राहकालाही प्रतिदिन 2 लाख रुपये जमा करता येणार आहेत. क्लासिक व मायस्ट्रो कार्डची रोजची रक्कम काढण्याची मर्यादा 31 ऑक्टोबरपासून 40 हजारांहून घटवून 20 हजार करण्यात आली होती. जर आपल्याला अधिक रकमेची गरज भासत असेल तर, दुसऱ्या श्रेणीतील कार्डसाठी अर्ज करावा, असे बँकेने स्पष्ट केले आहे. एटीएम व्यवहारात फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे. तसेच, कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाउल उचलण्यात आले आल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. एसबीआयनं मार्च 2018 पर्यंत बँकेने 39.50 कोटी डेबिट कार्ड जारी केले आहेत. यातील 26 कोटी कार्ड सध्या वापरात आहेत. अर्थात बँकेच्या अन्य कार्डवर या नियमांचा परिणाम होणार नाही. 

Web Title: biz customer can take a card with a higher withdrawal limit from the bank if they need

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SBIएसबीआय