Lokmat Money > बिझनेस न्यूज > फक्त इंटर्नशिपसाठी TCS, Infosys आणि Wipro सह १३ नोकऱ्या नाकारल्या; आज कमावतेय लाखो रुपये... 

फक्त इंटर्नशिपसाठी TCS, Infosys आणि Wipro सह १३ नोकऱ्या नाकारल्या; आज कमावतेय लाखो रुपये... 

इंटर्नशिप सहा महिन्यांची होती आणि त्यादरम्यान ८५ हजार रुपये मिळाले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 06:29 PM2023-08-15T18:29:00+5:302023-08-15T18:29:30+5:30

इंटर्नशिप सहा महिन्यांची होती आणि त्यादरम्यान ८५ हजार रुपये मिळाले. 

Bengaluru software engineer riti kumar rejected 13 job offers for internship. 1 year on, she earns over Rs 20 lpa | फक्त इंटर्नशिपसाठी TCS, Infosys आणि Wipro सह १३ नोकऱ्या नाकारल्या; आज कमावतेय लाखो रुपये... 

फक्त इंटर्नशिपसाठी TCS, Infosys आणि Wipro सह १३ नोकऱ्या नाकारल्या; आज कमावतेय लाखो रुपये... 

फक्त एक इंटर्नशिप करण्यासाठी २१ वर्षीय रिती कुमारी हिने TCS, Infosys आणि Wipro सह 13 कंपन्यांच्या ऑफर नाकारल्या. यापैकी एका कंपनीने १७ लाख रुपयांचे वार्षिक वेतन देऊ केले होते. पंरतू रिती कुमारीने या सर्व जॉब ऑफर बाजूला सारल्या आणि वॉलमार्टमध्ये इंटर्नशिप पूर्ण केली. रिती कुमारीला या नोकरीतच्या ऑफर नाकारून जवळपास एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. 

आता कुमारी वर्षाला २० लाख रुपयांहून अधिक कमावते. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, बंगळुरूस्थित सॉफ्टवेअर इंजीनियर रिती कुमारीने सांगितले की, सर्व जॉब ऑफर खूप चांगल्या होत्या, त्यापैकी माझ्या कुटुंबाला आणखी एक आवडला. परंतु माझ्या मनाचे ऐकून मी वॉलमार्टमध्ये इंटर्नशिप करण्याचा निर्णय घेतला. इंटर्नशिप सहा महिन्यांची होती आणि त्यादरम्यान मला ८५ हजार रुपये मिळाले. 

याचबरोबर, त्यावेळी टेक स्केटर नोकरीसाठी अवघड होते आणि नोकर कपातीच्या दरम्यान इंटर्नशिपचा निर्णय खूप धोकादायक होता, असे रिती कुमारीने सांगितले. तसेच, यादरम्यान माझ्या बहिणीने मला स्वत:च्या मनाचे ऐकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वॉलमार्ट इंटर्नशिप ऑफर मिळाल्याने मला आनंद झाला. त्यावेळीही सगळेच माझ्या निर्णयाच्या बाजूने नव्हते, पण मी निर्णय घेतला, असे रिती कुमारीने सांगितले. 

वॉलमार्टमध्ये इंटर्नशिपची ऑफर स्वीकारली, खूप मेहनत घेतली, प्री-प्लेसमेंट ऑफर इंटरव्ह्यू  दिला आणि शेवटी नोकरी मिळाली. माझ्या यशाने माझे आई-वडील खूप खूश आहेत. मला शाळा आणि महाविद्यालयाच्या इतिहासातील अव्वल रँकर्सपैकी एक असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या वडिलांना त्याचा खूप अभिमान आहे, असे रिती कुमारीने सांगितले. सध्या रिती कुमारी वॉलमार्टमध्ये काम करत आहे आणि तिचा पगार वार्षिक २० लाख रुपये आहे.

Web Title: Bengaluru software engineer riti kumar rejected 13 job offers for internship. 1 year on, she earns over Rs 20 lpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.