Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बॅँकांच्या विभागवार संपाला आजपासून प्रारंभ महाराष्ट्रातील बॅँका ५ डिसेंबरला संपावर

बॅँकांच्या विभागवार संपाला आजपासून प्रारंभ महाराष्ट्रातील बॅँका ५ डिसेंबरला संपावर

कसबा बावडा : विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बॅँकांचे कर्मचारी उद्या, मंगळवारपासून (दि. २)ते शुक्रवार (दि. ५) पर्यंत, असे सलग चार दिवस विभागवार संपावर जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी महाराष्ट्रातील सर्व बॅँका बंद राहणार आहेत. एक दिवसाच्या संपाच्या परिणामापेक्षा विभागवार करण्यात येणार्‍या संपाची झळ देशभरातील ग्राहकांना जास्त बसणार आहे.

By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:03+5:302014-12-02T00:36:03+5:30

कसबा बावडा : विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बॅँकांचे कर्मचारी उद्या, मंगळवारपासून (दि. २)ते शुक्रवार (दि. ५) पर्यंत, असे सलग चार दिवस विभागवार संपावर जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी महाराष्ट्रातील सर्व बॅँका बंद राहणार आहेत. एक दिवसाच्या संपाच्या परिणामापेक्षा विभागवार करण्यात येणार्‍या संपाची झळ देशभरातील ग्राहकांना जास्त बसणार आहे.

The bank's stampede commencement from today began on 5th December in Maharashtra | बॅँकांच्या विभागवार संपाला आजपासून प्रारंभ महाराष्ट्रातील बॅँका ५ डिसेंबरला संपावर

बॅँकांच्या विभागवार संपाला आजपासून प्रारंभ महाराष्ट्रातील बॅँका ५ डिसेंबरला संपावर

बा बावडा : विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बॅँकांचे कर्मचारी उद्या, मंगळवारपासून (दि. २)ते शुक्रवार (दि. ५) पर्यंत, असे सलग चार दिवस विभागवार संपावर जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी महाराष्ट्रातील सर्व बॅँका बंद राहणार आहेत. एक दिवसाच्या संपाच्या परिणामापेक्षा विभागवार करण्यात येणार्‍या संपाची झळ देशभरातील ग्राहकांना जास्त बसणार आहे.
२५ टक्के पगारवाढ करावी, पाच दिवसांचा आठवडा भरावा, नवीन नोकरभरती करावी, बॅँकांचे विलिनीकरण नको, सुधारित पेन्शन धोरण राबवावे, आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे. या मागण्यांसाठीआतापर्यंत अनेकवेळा संप, निदर्शने, घेरावो घालणे, निवेदन देणे, काळ्या फिती लावून काम करणे, असे प्रकार करून व्यवस्थापनाचे कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे संघटनांनी देशभरातील विविध पक्षांच्या खासदारांची भेट घेऊन शिष्टमंडळाद्वारे निवेदन दिले. तसेच या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली; परंतु केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडून या मागण्यांची संघटनेच्या मतानुसार पूर्तता झाली नसल्याने पुन्हा विभागवार संपाचे हत्यार उपसले आहे.
उद्यापासून (दि. २) विभागवार संपाला सुरूवात होणार आहे. त्याची सुरुवात दक्षिण भारतातून होणार आहे. दक्षिण भारतातील कर्मचारी जरी संपावर गेले, तरी देशभरातील इतर विभागातील कामकाज सुरू राहणार आहे. मात्र, एका विभागात संप असला आणि दुसर्‍या विभागातील बॅँका सुरू असल्या, तरी त्याचा परिणाम इतर विभागांतील ग्राहकांवर काही प्रमाणात होणार आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले, तर एखाद्या दक्षिण भारतातील ग्राहकाने उत्तर भारतातील बॅँकेत खाते असलेल्या कंपनीबरोबर ऑनलाईन व्यवहार करायचा म्हटले, तरी हा व्यवहार त्यावेळी उत्तर भारतात संप असल्यामुळे पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणजेच संप दक्षिण भारतात आणि त्याची झळ उत्तर भारतातील ग्राहकांनाही बसणार आहे.
अशा पद्धतीने बॅँका ३ डिसेंबरला उत्तर भारतात, ४ डिसेंबरला पूर्व भारतात, तर ५ डिसेंबरला पश्चिम भारतात संपावर जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि कोल्हापुरातील बॅँका शुक्रवारी संपावर असणार आहेत. ही संपाची हाक इंडियन बॅँक असोसिएशनने दिली आहे.

Web Title: The bank's stampede commencement from today began on 5th December in Maharashtra