Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Holidays 2022 : फेब्रुवारीमध्ये 12 दिवस बँका बंद राहणार; तुमच्या कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी!

Bank Holidays 2022 : फेब्रुवारीमध्ये 12 दिवस बँका बंद राहणार; तुमच्या कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी!

Bank Holidays 2022 : फेब्रुवारी महिन्यात वसंत पंचमी, गुरु रविदास जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात देशातील सर्वत्र बँका 12 दिवस बंद राहणार नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 01:47 PM2022-01-24T13:47:07+5:302022-01-24T13:48:02+5:30

Bank Holidays 2022 : फेब्रुवारी महिन्यात वसंत पंचमी, गुरु रविदास जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात देशातील सर्वत्र बँका 12 दिवस बंद राहणार नाहीत.

bank holidays 2022 : banks will be closed for 12 days in february see the list of holidays before making plans | Bank Holidays 2022 : फेब्रुवारीमध्ये 12 दिवस बँका बंद राहणार; तुमच्या कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी!

Bank Holidays 2022 : फेब्रुवारीमध्ये 12 दिवस बँका बंद राहणार; तुमच्या कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी!

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये 12 दिवस बँका बंद राहतील. दरम्यान, जानेवारी महिन्यांत बँकांना 16 दिवसांची सुट्टी होती. येत्या फेब्रुवारी महिन्यातील या सुट्ट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात वसंत पंचमी, गुरु रविदास जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात देशातील सर्वत्र बँका 12 दिवस बंद राहणार नाहीत.

बँकांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. फेब्रुवारी महिन्यात येणार्‍या काही सुट्ट्या/सण हे विशिष्ट राज्य किंवा प्रदेशाशी संबंधित असतात. त्यामुळे, बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. सुट्ट्यांची यादी पाहूनच बँकेत जाण्याचे नियोजन करणे चांगले ठरेल. तसेच, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही बुधवारी म्हणजेच 26 जानेवारीला बँका बंद राहतील.

दरम्यान, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. येथे आरबीआयच्या डिसेंबर महिन्याच्या यादीसोबत हे देखील सांगण्यात येत आहे की, कोणत्या दिवशी बँका कोणत्या राज्यात बंद राहतील आणि कुठे चालू राहतील. या आधारावर तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामाचा निपटारा ताबडतोब करावा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये.

फेब्रुवारी 2022 मधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी...
2 फेब्रुवारी : सोनम लोचर (गंगटोकमध्ये बँका बंद)
5 फेब्रुवारी : सरस्वती पूजा/श्री पंचमी/बसंत पंचमी (आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद)
6 फेब्रुवारी : रविवार
12 फेब्रुवारी: महिन्याचा दुसरा शनिवार
13 फेब्रुवारी : रविवार
15 फेब्रुवारी : मोहम्मद हजरत अली जन्मदिवस/लुई-नगाई-नी (इंफाळ, कानपूर, लखनऊमध्ये बँका बंद)
16 फेब्रुवारी: गुरु रविदास जयंती (चंदीगडमध्ये बँका बंद)
18 फेब्रुवारी: डोलजात्रा (कोलकात्यामध्ये बँका बंद)
19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (बेलापूर, मुंबई, नागपूर येथे बँका बंद)
20 फेब्रुवारी: रविवार
26 फेब्रुवारी: महिन्याचा चौथा शनिवार
27 फेब्रुवारी : रविवार

Web Title: bank holidays 2022 : banks will be closed for 12 days in february see the list of holidays before making plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.