lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Business Idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात एक लाख गुंतवा आणि दरमहा कमवा दहा लाख रुपये

Business Idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात एक लाख गुंतवा आणि दरमहा कमवा दहा लाख रुपये

Mushroom Farming: मशरूमची शेती हा बऱ्यापैकी फायदेशीर व्यवसाय आहे. त्यामध्ये तु्म्ही गुंतवणुकीतून १० लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळवू शकता. याचा अर्थ १ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमची दहा लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 06:05 PM2022-10-29T18:05:04+5:302022-10-29T18:05:45+5:30

Mushroom Farming: मशरूमची शेती हा बऱ्यापैकी फायदेशीर व्यवसाय आहे. त्यामध्ये तु्म्ही गुंतवणुकीतून १० लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळवू शकता. याचा अर्थ १ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमची दहा लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.

Awesome business plan, invest one lakh in this business and earn ten lakh rupees per month | Business Idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात एक लाख गुंतवा आणि दरमहा कमवा दहा लाख रुपये

Business Idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात एक लाख गुंतवा आणि दरमहा कमवा दहा लाख रुपये

जर तुम्ही कमी गुंतवणुकीत कुठल्याही उद्योगाची सुरुवात करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी उपयुक्त माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला ज्या उद्योगाबाबत माहिती देणार आहोत. त्यामध्ये कमी गुंतवणुकीसह चांगली कमाई करण्याची संधी मिळू शकते. त्या माध्यमातून तुम्ही दरमहा १० लाख रुपयांहून अधिकची कमाई करू शकता. तसं पाहायला गेलं तर हा लो कॉस्ट बिझनेस आहे. मात्र त्यामधून मिळणारा नफा तुम्हाला खूश करणारा असेल. हा व्यवसाय कृषिक्षेत्राशी निगडीत आहे.

मशरूमची शेती हा बऱ्यापैकी फायदेशीर व्यवसाय आहे. त्यामध्ये तु्म्ही गुंतवणुकीतून १० लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळवू शकता. याचा अर्थ १ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमची दहा लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. गेल्या काही वर्षांमध्ये मशरूमला बाजारात असलेली मागणी वाढली आहे. मशरूमच्या शेतीसाठी काय करावं लागतं, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

आजच्या काळात पार्टी आणि रेस्टॉरंट्समध्ये बटन मशरूमला सर्वांधिक मागणी आहे. ते तयार करण्यासाठी गहू किंवा तांदळाच्या भुशाला काही केमिकल्स लावून कंपोस्ट खत तयार केलं जातं. कंपोस्ट खत तयार होण्यासाठी महिनाभराचा अवधी लागतो. त्यानंतर कुठल्याही पृष्टभागावर ६-८ इंचांचा वाफा करून त्यामध्ये मशरूमच्या बीया पेरल्या जातात. त्यानंतर हे बियाणे कंपोस्टने झाकले जाते. ४०-५० दिवसांमध्ये मशरूम कापून विक्री करण्यासाठी योग्य होतात. मशरुमची शेती करण्यासाठी शेड असलेल्या जागेची आवश्यकता असते.

मशरूमच्या शेतीची १ लाख रुपयांपासून सुरुवात करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. एक किलो मशरुम तयार करण्यासाठी २५ ते ३० रुपये खर्च येतो. बाजारात हे मशरूम २५० ते ३०० रुपये किलो या दराने विकले जातात. मोठे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये चांगल्या क्वालिटीच्या मशरूमची सप्लाय करण्यासाठी ५०० रुपये प्रति किलोपर्यंतचा भाव मिळतो.  

Web Title: Awesome business plan, invest one lakh in this business and earn ten lakh rupees per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.