lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Anand Mahindra: अशी असते शेअर मार्केटची परिस्थिती, आनंद महिंद्रांनी पोस्ट केला मजेशीर व्हिडिओ

Anand Mahindra: अशी असते शेअर मार्केटची परिस्थिती, आनंद महिंद्रांनी पोस्ट केला मजेशीर व्हिडिओ

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ 3 लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला असून, त्यावर नेटीझन विविध कमेंट्स करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 11:18 AM2022-02-17T11:18:25+5:302022-02-17T11:27:29+5:30

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ 3 लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला असून, त्यावर नेटीझन विविध कमेंट्स करत आहेत.

Anand Mahindra: This is what stock market is, funny video posted by Anand Mahindra | Anand Mahindra: अशी असते शेअर मार्केटची परिस्थिती, आनंद महिंद्रांनी पोस्ट केला मजेशीर व्हिडिओ

Anand Mahindra: अशी असते शेअर मार्केटची परिस्थिती, आनंद महिंद्रांनी पोस्ट केला मजेशीर व्हिडिओ

मुंबई: आजच्या काळात अनेकजण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. या शेअर मार्केटमध्ये कधी खूप पैसे मिळतात, तर कधी मोठे नुकसानही सहन करावे लागते. या शेअर बाजारची परिस्थिती रोज सारखीच असेल, असे नाही. कधी मार्केट हाय असते तर कधी लो. याच मार्केटची परिस्थिती दाखवणारा एक मजेशीर व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मजेशीर किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेले व्हिडिओ खूप पाहिले जातात. आता त्यांनी एका रोलर कोस्टर राईडचा व्हिडिओ शेअर केला असून, या रोलर कोस्टर राईडची तुलना शेअर मार्केटसोबत केली आहे. तसेच, "शेअर बाजाराचा आणखी एक दिवस. कमकुवत मनाच्या लोकांसाठी नाही,"असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

आनंद महिंद्रांनी ट्विटरवर रोलर कोस्टरचा व्हिडिओ शेअर करुन त्याची तुलना शेअर बाजाराच्या अस्थिरतेशी केली आहे. तुम्ही रोलर कोस्टरवर बसला असाल, तर तुम्हाला कदाचित माहित असेल की, रोलर कोस्टर कधी वर जाते तर कधी वेगाने खाली येते. अंगावर शहारे आणणारी ही राईड असते. अशीच काहीशी परिस्थिती मार्केटची आहे. 

दरम्यान, हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि लोक त्यावर भरभरून कमेंट करत आहेत. नेटीझन्स आनंद महिंद्राशी पूर्णपणे सहमती दर्शवत आहेत, तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या त्यांच्या कथाही शेअर करत आहेत. काही लोकांनी शेअर मार्केटला रोलर कोस्टर राईडपेक्षा भीतीदायक म्हटले आहे.

Web Title: Anand Mahindra: This is what stock market is, funny video posted by Anand Mahindra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.