lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अंबानींची रिलायन्स चीनला टक्कर देणार, सोलर इंडस्ट्रीत मोठा डाव टाकणार

अंबानींची रिलायन्स चीनला टक्कर देणार, सोलर इंडस्ट्रीत मोठा डाव टाकणार

मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्स कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्लोबल मॅन्यूफॅक्चरींग क्षमेतेवर मजबूत पकड ठेवत आहे. कंपनीकडून नुकतेच ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये उतरण्याची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 02:17 PM2021-08-31T14:17:15+5:302021-08-31T14:18:28+5:30

मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्स कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्लोबल मॅन्यूफॅक्चरींग क्षमेतेवर मजबूत पकड ठेवत आहे. कंपनीकडून नुकतेच ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये उतरण्याची घोषणा केली आहे.

Ambani's Reliance will take on China, play a big role in the solar industry | अंबानींची रिलायन्स चीनला टक्कर देणार, सोलर इंडस्ट्रीत मोठा डाव टाकणार

अंबानींची रिलायन्स चीनला टक्कर देणार, सोलर इंडस्ट्रीत मोठा डाव टाकणार

Highlightsआरसीई ग्रुप चीनच्या सरकारी केमिकल कंपनी केमचायनाची इंटरनॅशनल मेंबर आहे. केमीचायनाची Pirelli Tyres आणि Syngenta मध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे.

नवी दिल्ली - देशातील सर्वात मौल्यवान असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीकडून आता सोलर उद्योग विश्वात मोठं पाऊल टाकण्यात येत आहे. सोलर पॅनेल बनवणारी युरोमधील सर्वात मोठी कंपनी असलेल्या आरईसी ग्रुपला विकत घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी, रिलायन्सकडून चायना नॅशनल केमिकल कॉर्पसोबत बोलणी सुरू आहे. दोन्ही कंपनीतील हा करार जवळपास 1 ते 1.2 अब्ज डॉलर एवढा मोठा असल्याची माहिती आहे. 

मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्स कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्लोबल मॅन्यूफॅक्चरींग क्षमेतेवर मजबूत पकड ठेवत आहे. कंपनीकडून नुकतेच ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये उतरण्याची घोषणा केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 50 ते 60 कोटी डॉलरच्या कर्ज प्रक्रियेसाठी जागतिक बँकेसोबत बोलणी सुरू आहे. तर, उर्वरीत राशी इक्विटीच्या माध्यमातून जमविण्यात येईल. आरईसी ग्रुपचे हेडक्वार्टर नॉर्वेमध्ये असून ती कंपनी सिंगापूर येथील नोंदणीकृत आहे. 

आरसीई ग्रुप चीनच्या सरकारी केमिकल कंपनी केमचायनाची इंटरनॅशनल मेंबर आहे. केमीचायनाची Pirelli Tyres आणि Syngenta मध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे. आरईसी फोटोव्हॉल्टेईक एप्लिकेशन्स आणि मल्टी क्रिस्टालाइन वैफर्ससाठी सिलीकॉन मटेरियल बनिण्याचं काम करते. तसेच, कंपनीकडून रुफटॉफ इस्टॉलेशन, इंडस्ट्रीयल आणि सोलर पार्क्स के लिए सोलर सेल्स व मॉड्यूल्स बनविते. 

दरम्यान, सध्या सोलर इंडस्ट्रीजसाठी चीनवर निर्भर असल्याने जगभरातील देश त्रस्त आहेत. त्यामुळेच, भारत आणि अमेरिकासारख्या आता स्थानिक कंपन्यांना प्रोत्साहन देत आहेत. 2019 मध्ये जेव्हा सोलर पॅनेल बनविण्यासाठी उपयोगी होणारा एक तृतियांश पॉलिसिलीकॉन चीनच्या शिनजीयांग प्रांतातून येत होता. मात्र, आता रेन्यू पावर, अडानी ग्रुप व रिलायन्स इंडस्ट्रीजने मोठ्या मॅन्यूफॅक्चरिंग प्रोडक्टची घोषणा केली आहे. 
 

Web Title: Ambani's Reliance will take on China, play a big role in the solar industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.