lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'मोदी सरकार मार्च अखेरपर्यंत एअर इंडिया अन् भारत पेट्रोलियम विकणार'

'मोदी सरकार मार्च अखेरपर्यंत एअर इंडिया अन् भारत पेट्रोलियम विकणार'

सितारमण यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 12:11 PM2019-11-17T12:11:36+5:302019-11-17T12:12:44+5:30

सितारमण यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला.

Air India and BPCL to sell by end of March, nirmala Sitaraman says enterview | 'मोदी सरकार मार्च अखेरपर्यंत एअर इंडिया अन् भारत पेट्रोलियम विकणार'

'मोदी सरकार मार्च अखेरपर्यंत एअर इंडिया अन् भारत पेट्रोलियम विकणार'

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी भारत पेट्रोलियम आणि एअर इंडियाच्या विक्रीबाबत मोठं विधान केलं आहे. एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकरच या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीची प्रकिया पूर्ण व्हावी, असे सरकारला वाटत आहे. म्हणून मार्च अखेरपर्यंत या दोन्ही कंपन्यांची विक्री करण्याचा विचार सरकार करत असल्याचं निर्मला सितारमण यांनी सांगितलंय.

सितारमण यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला. मार्च महिनाअखेरपर्यंत एअर इंडिया आणि भारत पट्रोलियम या कंपन्यांच्या विक्रीची प्रकिया पूर्ण होईल, असे त्यांनी म्हटले. चालू आर्थिक वर्षात करसंकलनात झालेली घट पाहून निर्गुंतवणूक आणि धोरणात्मक विक्रीच्या माध्यमातून महसूल गोळा करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह असल्याचंही सितारमण यांनी सांगितलं. 

आर्थिक मंदीचे मळभ दूर करण्यासाठी वेळेवर आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. अनेक क्षेत्र या मंदीतून सावरत आहेत. आपलं ताळेबंद सुधारा असं अनेक उद्योगांच्या मालकांना सांगण्यात आलं असून, त्यातील अनेकांनी नवी गुंतवणूक करण्याची तयारी सुरू केली आहे, असे सांगत देशातील आर्थिक मंदीवरही सितारमण यांनी भाष्य केलं. 

Web Title: Air India and BPCL to sell by end of March, nirmala Sitaraman says enterview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.