lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पुन्हा कोर्टात पोहोचले अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण, SC च्या निर्णयावर पुनर्विलोकन याचिका

पुन्हा कोर्टात पोहोचले अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण, SC च्या निर्णयावर पुनर्विलोकन याचिका

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शॉर्ट सेलर हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 07:27 PM2024-02-13T19:27:53+5:302024-02-13T19:28:31+5:30

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शॉर्ट सेलर हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते.

Adani-Hindenburg case again in court, review petition on Supreme Court decision | पुन्हा कोर्टात पोहोचले अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण, SC च्या निर्णयावर पुनर्विलोकन याचिका

पुन्हा कोर्टात पोहोचले अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण, SC च्या निर्णयावर पुनर्विलोकन याचिका

Adani-Hindenburg row: उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग (Hindenberg Research) यांच्यातला वाद पुन्हा एकदा कोर्टात पोहोचला आहे. शेअर बाजार नियामक सेबीच्या (SEBI) तपासाला हिरवी झेंडी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे. अनामिका जैस्वाल यांनी ही याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्त्या अनामिका जैस्वाल यांनी असा युक्तिवाद केला आहे की, सर्वोच्च न्यायालयाने 3 जानेवारी रोजी दिलेल्या आदेशाचे पुनरावलोकन करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून काही सकारात्मक विधाने असूनही, अदानी समूहाने सिक्युरिटीज कायद्यांचे उल्लंघन केले आहे की नाही, याची सेबीची चौकशी अजूनही सुरू आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, सेबीने त्यांच्या अहवालात केवळ 24 तपासांची माहिती दिली आहे.

सेबी तपास
जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सेबीला तीन महिन्यांत तपास पूर्ण करण्यास सांगितले होते. सेबीने आपल्या अहवालात म्हटले की, 24 पैकी 22 तपास अंतिम होते आणि 2 प्रकरणे तपासाधीन आहेत. दरम्यान, SEBI च्या 22 प्रकरणांपैकी दोन प्रकरणे शेअरच्या किमतीत फेरफार, संबंधित पक्षाचे व्यवहार उघड करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल 13, इनसाइडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघनाप्रकरणी 5 आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) आणि टेकओव्हरच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एका प्रकरणाचा समावेश आहे. 

काय प्रकरण आहे?
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. अदानी समूहाने आपल्या शेअर्सच्या किमती वाढवल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांमुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य US$ 100 अब्जांनी घसरले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सेबीला या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्यास सांगितले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए.एम.सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समितीही स्थापन करण्यात आली होती. गेल्या वर्षी मे मध्ये तज्ञ समितीला आपल्या प्रथमदर्शनी अहवालात सेबीच्या बाजूने कोणतीही त्रुटी आढळली नाही.

Web Title: Adani-Hindenburg case again in court, review petition on Supreme Court decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.