lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Hero Motorcorp'च्या पवन मुंजाल यांना मोठा दिलासा! ईडीच्या कारवाईला स्थगिती

Hero Motorcorp'च्या पवन मुंजाल यांना मोठा दिलासा! ईडीच्या कारवाईला स्थगिती

दिल्ली हायकोर्टाने हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांच्याविरुद्ध सुरू असललेल्या ईडी कारवाईला स्थगिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 03:24 PM2023-11-17T15:24:20+5:302023-11-17T15:31:59+5:30

दिल्ली हायकोर्टाने हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांच्याविरुद्ध सुरू असललेल्या ईडी कारवाईला स्थगिती दिली आहे.

A big relief for Hero Motorcorp's Pawan Munjal Suspension of ED action | Hero Motorcorp'च्या पवन मुंजाल यांना मोठा दिलासा! ईडीच्या कारवाईला स्थगिती

Hero Motorcorp'च्या पवन मुंजाल यांना मोठा दिलासा! ईडीच्या कारवाईला स्थगिती

हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.  पवन कांत मुंजाल यांच्याविरुद्ध ईडी कारवाईला स्थगिती दिली आहे. या संदर्भात आज १७ नोव्हेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालया सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, महसूल गुप्तचर संचालकांच्या तक्रारीला न्यायालयाने ३ नोव्हेंबर रोजी स्थगिती दिली होती आणि ही तक्रार ईडीच्या तपासाचा आधार आहे. त्यामुळे ईडीची कारवाईही थांबवण्यात यावी. या प्रकरणाची सुनावणी आता २१ मार्च रोजी होऊ शकते.

अमेरिकेने इस्रायलला मोठा झटका दिला; युएनच्या सुरक्षा परिषदेत गाझाच्या बाजुने प्रस्ताव संमत

मुंजाल यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तीविरुद्ध डीआरआयने केलेल्या तक्रारीच्या आधारे हा तपास सुरू करण्यात आला. अघोषित परकीय चलन बाळगल्याप्रकरणी या व्यक्तीची चौकशी सुरू आहे. मुंजाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासाचा आधार महसूल गुप्तचर संचालनालयाची तक्रार आहे, त्यामुळे ईडीच्या कारवाईला स्थगिती देण्यात यावी. रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले की, या कथित घटना पाच वर्षांपूर्वी घडल्या होत्या, पण आता त्यांची चौकशी केली जात आहे.

दुसरीकडे, ईडीचे वकील झोएब हुसैन यांनी युक्तिवाद केला की केंद्रीय एजन्सीचा तपास डीआरआयच्या तक्रारीवर आधारित नाही. हुसेन म्हणाले की, सीमाशुल्क विभागाचे लक्ष सीमाशुल्क सीमेवर ८१ लाख रुपये जप्त करण्यावर आहे, तर अंमलबजावणी संचालनालय एका मोठ्या गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहे, ज्याचा फायदा मुंजाल यांना झाला. मुंजाल या अघोषित परकीय चलनाचे लाभार्थी असल्याचे पुरावे तपास यंत्रणेकडे असल्याचेही ईडीच्या वकिलांनी सांगितले.

Web Title: A big relief for Hero Motorcorp's Pawan Munjal Suspension of ED action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.