lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेमी कंडक्टरसाठी ७६ हजार कोटी; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रोत्साहन योजनेस मंजुरी  

सेमी कंडक्टरसाठी ७६ हजार कोटी; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रोत्साहन योजनेस मंजुरी  

नवी दिल्ली : वाहनांसाठी तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणाऱ्या सेमी कंडक्टर्सचे  डिझाईन व उत्पादन भारतातच मोठ्या प्रमाणात व्हावे, यासाठी ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 12:15 PM2021-12-16T12:15:44+5:302021-12-16T12:16:09+5:30

नवी दिल्ली : वाहनांसाठी तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणाऱ्या सेमी कंडक्टर्सचे  डिझाईन व उत्पादन भारतातच मोठ्या प्रमाणात व्हावे, यासाठी ...

76000 crore for semiconductors Union Cabinet approves incentive scheme | सेमी कंडक्टरसाठी ७६ हजार कोटी; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रोत्साहन योजनेस मंजुरी  

सेमी कंडक्टरसाठी ७६ हजार कोटी; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रोत्साहन योजनेस मंजुरी  

नवी दिल्ली : वाहनांसाठी तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणाऱ्या सेमी कंडक्टर्सचे  डिझाईन व उत्पादन भारतातच मोठ्या प्रमाणात व्हावे, यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ७६ हजार कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेस बुधवारी मान्यता दिली. सध्या सेमी कंडक्टर पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने वाहनांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. 

पुढील सहा वर्षांत सेमी कंडक्टर्सच्या बाबतीत देशाने स्वयंपूर्ण व्हावे, यादृष्टीने या प्रोत्साहन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. भारत हे केवळ सेमी कंडक्टरच नव्हे, तर सर्वच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे प्रमुख निर्मिती केंद्र बनावे, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. 

नव्या सेमी कंडक्टर धोरणामुळे देशात वाहनांचे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादनही अधिक वेगाने होणे शक्य आहे, असे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: 76000 crore for semiconductors Union Cabinet approves incentive scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.