modi government collected 113143 crore gross GST revenue in the month of February 2021 | GST revenue : मोदी सरकारची पाचही बोटं तुपात! सलग ५ व्या महिन्यात १ लाख कोटींहून अधिक GST जमा

GST revenue : मोदी सरकारची पाचही बोटं तुपात! सलग ५ व्या महिन्यात १ लाख कोटींहून अधिक GST जमा

देशाच्या तिजोरीत बक्कळ भर टाकणारी आनंदाची बातमी मोदी सरकारला मिळाली आहे. सलग पाचव्या महिन्यात १ लाख कोटींहून अधिक मिळकत जीएसटीच्या (GST Collection) माध्यमातून केंद्र सरकारला मिळाली आहे. अर्थमंत्रालयानं जाहीर केलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात जीएसटीतून मिळालेलं उत्पन्न तब्बल १.१३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जीएसटीपेक्षा यंदा ७ टक्क्यांनी अधिक रक्कम जमा झाली आहे. (Modi Government Collected 1,13,143 crore gross GST revenue in the month of February 2021)

मोदी सरकारला याआधी सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) देखील दिलासा मिळाला होता. तिसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीत ०.४ टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. केंद्रीय अर्थमंत्रालयानं सोमवारी जाहीर केल्यानुसार सलग पाचव्या महिन्यात जीएसटीतून मिळालेलं उत्पन्न हे १ लाख कोटींपेक्षा अधिक आहे. कोरोनाचा काळ असतानाही जीएसटीतून मिळणारी मिळकत वाढल्यामुळं सरकारला आर्थिक बाबतीत मोठा दिलासा मिळाला आहे. जीएसटीच्या उत्पन्नात झालेली वाढ म्हणजेच अर्थव्यवस्था आता रुळावर येत असल्याची चिन्ह मानली जात आहेत. 

केंद्र सरकारला फेब्रुवारी महिन्यात जीएसटीमधून एकूण १.१३ लाख कोटींचं उत्पन्न मिळालं. यात केंद्राचा वाटा (CGST) २१ हजार ९२ कोटी रुपयांचा आहे. राज्याचा वाटा (SGST) २७ हजार २७३ कोटी रुपयांचा आहे. एकात्मिक जीएसटीचा (IGST) यात तब्बल ५५ हजार २५३ कोटी रुपयांचा वाटा आहे. यात परदेशातून आयात करण्यात आलेल्या वस्तूंवरील जीएसटीचाही समावेश आहे. केंद्राकडून लावण्यात येणाऱ्या विविध सेसमधून ९ हजार ५२५ कोटी रुपये जीएसटीमधून मिळाले आहेत. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: modi government collected 113143 crore gross GST revenue in the month of February 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.