lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्स डिजिटलच्या दसऱ्यानिमित्त ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना

रिलायन्स डिजिटलच्या दसऱ्यानिमित्त ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना

सण आणि उत्सवाच्या काळामध्ये तुमच्या आनंदात या वर्षी आणखी भर पडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 05:47 AM2019-10-05T05:47:57+5:302019-10-05T05:48:33+5:30

सण आणि उत्सवाच्या काळामध्ये तुमच्या आनंदात या वर्षी आणखी भर पडणार आहे.

 Many attractive schemes for the customers of Reliance Digital | रिलायन्स डिजिटलच्या दसऱ्यानिमित्त ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना

रिलायन्स डिजिटलच्या दसऱ्यानिमित्त ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना

मुंबई : सण आणि उत्सवाच्या काळामध्ये तुमच्या आनंदात या वर्षी आणखी भर पडणार आहे. दसºयानिमित्त रिलायन्सने सर्व ग्राहकांसाठी ‘फेस्टिव्ह आॅफ इलेक्ट्रॉनिक’ ही आश्चर्यकारक आणि आकर्षक योजना आणली आहे. या योजनेमुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे.
दसºयामध्ये रिलायन्स डिजिटल आणि माय जियो स्टोअर सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर अत्यंत मनमोहक आॅफर्स देणार आहे. यामध्ये १५ टक्के कॅशबॅक आणि १० टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. इतकेच नव्हे, तर भाग्यवान ग्राहकांना एक किलो सोने, लक्झरी कार, मोटारसायकल, एलईडी टीव्ही, लॅपटॉप आणि आयफोन जिंकता येणार आहे.
याशिवाय या स्टोअरमध्ये हमखास अनेक सुविधा मिळणार आहेत. यामध्ये जियो व्हाउचर आणि जिओ सावनचे सहा महिन्यांचे मोफत सबक्रिप्शनही ग्राहकांना मिळणार आहे. या आकर्षक योजना सर्व वस्तूंवर उपलब्ध आहेत, अशी माहिती रिलायन्स डिजिटलतर्फे शुक्रवारी देण्यात आली.
देशातील सर्व रिलायन्स डिजिटल आणि माय जियो स्टोअरमध्ये उद्या, शनिवार, ५ आॅक्टोबरपासून ८ आॅक्टोबरपर्यंत ही आकर्षक योजना सुरू राहणार आहे. याद्वारे टीव्ही, घरगुती उत्पादने, मोबाइल, लॅपटॉप आणि इतर उत्पादने घेतल्यास आर्थिक फायदा मिळू शकेल. (वा. प्र.)

Web Title:  Many attractive schemes for the customers of Reliance Digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.