lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Gas Price Today: डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची वाढ

LPG Gas Price Today: डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची वाढ

LPG Gas Price Today: नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन कंपन्यांचा ग्राहकांना झटका. पाहा किती आहे तुमच्या शहरातील दर.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 09:30 AM2021-12-01T09:30:47+5:302021-12-01T09:31:10+5:30

LPG Gas Price Today: नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन कंपन्यांचा ग्राहकांना झटका. पाहा किती आहे तुमच्या शहरातील दर.

lpg price today on 1 deceber 2021 gas cylinder price delhi mumbai chennai kolkata check details | LPG Gas Price Today: डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची वाढ

LPG Gas Price Today: डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची वाढ

LPG Gas Price Today: सामान्यांवर महागाईचं संकट सध्या मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे. १ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून अनेक गोष्टींसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. अशा परिस्थितीत आता सरकारी इंधन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरचे दर (LPG Gas Cylinder Price) मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. आज कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात या सिलिंडरच्या दरात २६६ रुपयांची वाढ करण्यात आली. दरम्यान घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

आजच्या वाढीनंतर दिल्लीत १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरचे दर आता २१०० रुपयांच्या वर गेले आहेत. याशिवाय दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर ८९९.५० रुपये इतके झाले आहे. 

कोणत्या शहरात किती दर?
दिल्ली- २१०१ रुपये
कोलकाता - २१७७ रुपये
मुंबई - २०५१ रुपये
चेन्नई - २२३४ रुपये

कसे पाहाल दर?
जर तुम्हाला आपल्या शहरातील गॅस सिलिंडरचे दर तपासायचे असतील तर तुम्ही इंधन कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून पाहू शकता. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx  या लिंकवर क्लिक करूनही तुम्हाला नवे दर पाहतो येतील. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे नवे दर जारी करण्यात येतात.

Read in English

Web Title: lpg price today on 1 deceber 2021 gas cylinder price delhi mumbai chennai kolkata check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.