lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Saral Jeevan Bima: 1 जानेवारीपासून विमा कंपन्या देणार 'ही' पॉलिसी; जाणून घ्या, याबद्दल...

Saral Jeevan Bima: 1 जानेवारीपासून विमा कंपन्या देणार 'ही' पॉलिसी; जाणून घ्या, याबद्दल...

Saral Jeevan Bima: विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Insurance Regulatory and Development Authority) जीवन विमा कंपन्यांना 1 जानेवारी 2021 पर्यंत एक स्टँडर्ड 'सरल जीवन विमा' पॉलिसी लागू करण्याची सूचना केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 08:33 PM2020-10-15T20:33:40+5:302020-10-15T21:00:46+5:30

Saral Jeevan Bima: विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Insurance Regulatory and Development Authority) जीवन विमा कंपन्यांना 1 जानेवारी 2021 पर्यंत एक स्टँडर्ड 'सरल जीवन विमा' पॉलिसी लागू करण्याची सूचना केली आहे.

IRDAI asks life insurers to launch ‘Saral Jeevan Bima’ scheme by Jan 1 | Saral Jeevan Bima: 1 जानेवारीपासून विमा कंपन्या देणार 'ही' पॉलिसी; जाणून घ्या, याबद्दल...

Saral Jeevan Bima: 1 जानेवारीपासून विमा कंपन्या देणार 'ही' पॉलिसी; जाणून घ्या, याबद्दल...

Highlightsअटी व शर्तींच्या संदर्भात सध्या अस्तित्त्वात असलेली उत्पादने खूप भिन्न आहेत, ज्यामुळे ग्राहकांना विचारपूर्वक निर्णय घेण्यास अडचण येत आहेत.

नवी दिल्ली : देशातील सर्व विमा कंपन्यांना 1 जानेवारी 2021 पासून मुदत जीवन विमा पॉलिसी (Term Life Insurance Policy) अनिवार्यपणे द्यावी लागणार आहे. दरम्यान, विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Insurance Regulatory and Development Authority) जीवन विमा कंपन्यांना 1 जानेवारी 2021 पर्यंत एक स्टँडर्ड 'सरल जीवन विमा' पॉलिसी लागू करण्याची सूचना केली आहे.

विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हटले आहे की, 'सरल जीवन विमा' पॉलिसी ही पूर्णपणे मुदतीची जीवन विमा पॉलिसी असणार आहे. जी 18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणीही घेऊ शकते आणि त्याचा कालावधी चार ते 40 वर्षांपर्यंत असणार आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार, या विमा योजनेंतर्गत एखाद्याला 5 लाख ते 25 लाख रुपयांचा विमा मिळू शकतो. हा 50,000 रुपयांच्या मल्टीपलमध्ये असणार आहे.

"सर्व जीवन विमा कंपन्यांना 1 जानेवारी 2021 पासून प्रमाणित जीवन विमा उत्पादने सादर करणे बंधनकारक असेल. त्यांना यासाठी नवीन प्रीमियम व्यवहाराची परवानगी दिली जाईल," असे  विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हटले आहे. बाजारातील विविध टर्म उत्पादने पाहता विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने हे प्रमाणित उत्पादन तयार केले आहे.

अटी व शर्तींच्या संदर्भात सध्या अस्तित्त्वात असलेली उत्पादने खूप भिन्न आहेत, ज्यामुळे ग्राहकांना विचारपूर्वक निर्णय घेण्यास अडचण येत आहेत. यासंदर्भात बजाज अलायन्झ लाइफचे मुख्य वित्त अधिकारी भारत कलसी म्हणाले की, " विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बाजार आणि देशाच्या गरजेनुसार आहेत. आम्ही याचे स्वागत करतो. तसेच, यामुळे लोकांमध्ये जागरूकता वाढविण्यात मदत होईल."

Web Title: IRDAI asks life insurers to launch ‘Saral Jeevan Bima’ scheme by Jan 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.