lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोस्टाच्या 'या' पाच योजनांमध्ये गुंतवणूक करा अन् मिळवा जबरदस्त फायदा

पोस्टाच्या 'या' पाच योजनांमध्ये गुंतवणूक करा अन् मिळवा जबरदस्त फायदा

बऱ्याचदा आपल्याला गुंतवणुकीची चिंता सतावत असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:12 AM2020-01-15T11:12:06+5:302020-01-15T11:22:53+5:30

बऱ्याचदा आपल्याला गुंतवणुकीची चिंता सतावत असते.

Invest in five of these 'Post' schemes and get tremendous benefits | पोस्टाच्या 'या' पाच योजनांमध्ये गुंतवणूक करा अन् मिळवा जबरदस्त फायदा

पोस्टाच्या 'या' पाच योजनांमध्ये गुंतवणूक करा अन् मिळवा जबरदस्त फायदा

Highlightsपोस्टातही गुंतवणूक करणं हे जास्त फायद्याचं असतं. पोस्टात केलेल्या गुंतवणुकीवर आपल्याला चांगला नफा मिळतो. कमी वेळात पोस्टात गुंतवलेली रक्कम चांगला परतावा मिळवून देते. पोस्टात जवळपास नऊ पद्धतीच्या बचत योजना आहेत. त्यातील पाच योजनांना सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूट दिली जाते.

नवी दिल्लीः बऱ्याचदा आपल्याला गुंतवणुकीची चिंता सतावत असते. कुठल्या योजनेत गुंतवणूक करायची, याचाच विचार आपण करत असतो, काही जण बँकेत गुंतवणूक करणाऱ्या प्राधान्य देतात. पण पोस्टातही गुंतवणूक करणं हे जास्त फायद्याचं असतं. पोस्टात केलेल्या गुंतवणुकीवर आपल्याला चांगला नफा मिळतो. कमी वेळात पोस्टात गुंतवलेली रक्कम चांगला परतावा मिळवून देते. पोस्टात जवळपास नऊ पद्धतीच्या बचत योजना आहेत. त्यातील पाच योजनांना सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूट दिली जाते. या बचत योजनांमध्ये गुंतवलेल्या रकमेवर भारतीय पोस्ट ऑफिस आपल्याला 6.9 ते 8.6 टक्क्यांपर्यंत व्याज देते. पोस्टातल्या अशाच काही योजनांबद्दल माहिती देत आहोत.

15 वर्षीय सार्वजनिक भविष्य निधी खातं(पीपीएफ)- पीपीएफचं खातं आपल्याला 100 रुपयांमध्ये उघडता येते. यातील जमा रकमेवर 7.9 टक्के व्याज दिलं जातं. खातेधारकांना आपल्या खात्यात 500 रुपये आणि जास्तीत जास्त करून 1.50 लाख रुपये जमा करावे लागतात. तसेच खात्याची मर्यादा 15 वर्षांसाठी असते. यात आपण संयुक्त खातंही उघडू शकतो. आपल्याला या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही प्राप्त होते. यात एका वित्त वर्षात तुम्हाला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो.

सुकन्या समृद्धी योजना- मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली.  मुलींच्या घटत्या जन्मदराची चिंता सतावत असताना त्यांच्या उत्कर्षासाठी काढण्यात आलेल्या सुकन्या योजनेचाही ग्राहकांनी भरभरून लाभ घेतला. केंद्र सरकारनं या योजनेमध्ये आणखी सुधारणा करून नियमांमध्ये काही बदल केले आहेत. सरकारनं या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर वाढवून 8.4 टक्के केले आहे. या योजनेत कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच या योजनेला सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूटही मिळते.  

वरिष्ठ नागरिक बचत खाते(एससीएसएस): 60 वर्षं वयाची व्यक्तीही या योजनेत खातं उघडू शकते. 55 ते 60 वर्षं वयाच्या व्यक्ती निवृत्तीच्या तीन महिने आधीही या योजनेत खातं खोलून पैसे गुंतवू शकतात. खातं उघडल्यानंतर आपल्याला कमीत कमी 1000 रुपये जमा ठेवावे लागतात. या खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये साठवून ठेवू शकता. ज्यावर तुम्हाला वर्षाला 8.6 टक्के व्याज मिळते. या योजनेची मर्यादा पाच वर्षांची असते. डिसेंबर 2018च्या तिमाहीत वरिष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्हाला प्रतिवर्ष 8.7 टक्के व्याज मिळत होते. वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याज 31 मार्च/30 सप्टेंबर/ 31 डिसेंबरला जमा करण्याच्या तारखेपासून लागू होते. त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबरपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळणार आहे. दरवर्षी 6000 रुपयांची बचत केल्यास 15 वर्षांनी मुदत संपल्यावर 1.7 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. खात्रीशीर व्याज देणारा आणि पीपीएफच्या सुरक्षित पर्यायाचा विचार केला पाहिजे. जितक्या लवकर बचत सुरू करता येईल तितका चांगला फायदा मिळेल.


नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट(एनएससी): नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत डिसेंबरला संपणा-या तिमाहीसाठी 7.9 टक्क्यांनी व्याज मिळत होते. या योजनेंतर्गत तुम्ही 100 रुपये गुंतवू शकता. तसेच 100 रुपयांनंतर या योजनेत गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही. पहिल्यांदा या योजनेत गुंतवणूक करणा-याला वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळत होते. आता त्याच्यात वाढ करण्यात आली आहे. 

पोस्ट ऑफिसचं टाइम डिपॉझिट अकाऊंट (Post Office Time Deposit Account (TD)-  या योजनेत पैसे यासाठी जमा करावेत की सध्या या योजनेत जास्तीत जास्त 6.9 ते 7.7 टक्के व्याज दिले जात आहे. जर या व्याजदरावर एक लाख रुपये जमा केल्यास पाच वर्षांनंतर 4.6 लाख रुपये रिटर्न मिळेल. या रकमेतून म्हणजेच एक लाख रुपये कमी केल्यास 20 वर्षांनंतर एकूण 3.6 लाख रुपये निव्वळ व्याज मिळेल. 200 रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करता येते असून, जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यात कोणतीही मर्यादा नाही. तसेच या योजनेला सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूटही मिळते.  
 

Web Title: Invest in five of these 'Post' schemes and get tremendous benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.