lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर : नाणेनिधी

भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर : नाणेनिधी

Indian economy News : भारतीय अर्थव्यवस्थेची गती चांगली असून, ती सुधारणेच्या मार्गावरून जात असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे. या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेची वाढ चांगली झालेली दिसण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 07:29 AM2021-03-29T07:29:46+5:302021-03-29T07:30:54+5:30

Indian economy News : भारतीय अर्थव्यवस्थेची गती चांगली असून, ती सुधारणेच्या मार्गावरून जात असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे. या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेची वाढ चांगली झालेली दिसण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. 

Indian economy on the way to recovery: IMF | भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर : नाणेनिधी

भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर : नाणेनिधी

वॉशिंग्टन : भारतीय अर्थव्यवस्थेची गती चांगली असून, ती सुधारणेच्या मार्गावरून जात असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे. या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेची वाढ चांगली झालेली दिसण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. 
नाणेनिधीच्या प्रवक्त्या गेरी राईस यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भारतीय अर्थव्यवस्थेबाबत स्तुतीचे शब्द काढले. कोरोनाच्या महामारीनंतर चालू वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था चांगली सुधारणा दाखविण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या तिमाहीमधील वाढ ही सर्वंकष असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. 
या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीबरोबरच गुंतवणूक आणि भांडवल वाढ झालेली दिसून येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. 
लॉकडाऊननंतर या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये पीएमआय तसेच व्यापार वाढण्याचे संकेत मिळत आहेत. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली जोखीम आता कमी होऊ लागली  आहे.

Web Title: Indian economy on the way to recovery: IMF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.