lokmat Supervote 2024
Lokmat Money >आयकर > एक दिवस बाकी; आतापर्यंत 6 कोटी लोकांना भरला ITR, उद्या शेवटची तारीख

एक दिवस बाकी; आतापर्यंत 6 कोटी लोकांना भरला ITR, उद्या शेवटची तारीख

तुम्ही अजून आयकर भरला नसेल तर तात्काळ भरुन घ्या. उद्या(31 जुलै) शेवटची तारीख आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 06:10 PM2023-07-30T18:10:31+5:302023-07-30T18:18:32+5:30

तुम्ही अजून आयकर भरला नसेल तर तात्काळ भरुन घ्या. उद्या(31 जुलै) शेवटची तारीख आहे.

One day left; So far 6 crore people filed ITR, 31 july 2023 is the last date | एक दिवस बाकी; आतापर्यंत 6 कोटी लोकांना भरला ITR, उद्या शेवटची तारीख

एक दिवस बाकी; आतापर्यंत 6 कोटी लोकांना भरला ITR, उद्या शेवटची तारीख

नवी दिल्ली: आयकर भरण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. आयकर भरण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक असून, रविवार (30 जुलै) पर्यंत सुमारे सहा कोटी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्यात आले आहेत, अशी माहिती आयकर विभागाने दिली आहे. 31 जुलै 2023 ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही अद्याप आयकर भरला नसेल, तर लवकरात लवकर भरुन घ्या.

एका ट्विटमध्ये आयकर विभागाने म्हटले की, आज (30 जुलै) दुपारी 1 वाजेपर्यंत 5.83 कोटी ITR दाखल करण्यात आले आहेत. ही संख्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. आज आज दुपारी 1 वाजेपर्यंत 46 लाख लॉगिन आणि 10.39 लाख आयटीआर दाखल झाल्याची माहितीही विभागाने दिली.

असा भरा ITR 
आयकर रिटर्न भरण्यासाठी सर्वप्रथम ई-फायलिंग पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in ला भेट द्या. तुमचे आधीच खाते असेल तर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. खाते नसल्यास लॉगईनचा ​​पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला होमपेजवर e-file चा पर्याय निवडावा लागेल आणि File Income Tax Return चा पर्याय निवडावा लागेल. यानंतर वर्ष निवडा आणि आपला आयटीआर भरा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला योग्य फॉर्म निवडावा लागेल.

तुम्ही नोकरी करणारे असाल तर ITR-1 फॉर्म निवडावा लागेल. पगारदार करदात्याला आधीच भरलेला फॉर्म मिळेल. याच्या मदतीने तुम्ही सॅलरी स्लिप, फॉर्म 16 आणि AIS मधील डेटा मर्ज करू शकता. रिटर्नचा दावा करण्यापूर्वी तुमचे बँक तपशील तपासा. सर्व आवश्यक गोष्टी तपासल्यानंतर, तुम्हाला ITR सबमिट करावा लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर आयटीआरला ई-व्हेरिफिकेशन करावे लागेल. पावती क्रमांकाच्या मदतीने तुम्ही तुमची स्थिती सहज तपासू शकता.

Web Title: One day left; So far 6 crore people filed ITR, 31 july 2023 is the last date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.