lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेंटवर घेतलेली जागा Google साठी ठरतेय लकी! आता १ अब्ज डॉलरला विकतच घेणार; जाणून घ्या

रेंटवर घेतलेली जागा Google साठी ठरतेय लकी! आता १ अब्ज डॉलरला विकतच घेणार; जाणून घ्या

गुगलचे हे ऑफिस कुठे स्थित आहे? १० हजार कर्मचारी काम करू शकणाऱ्या या ऑफिसची वैशिष्ट्ये काय? पाहा, डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 09:56 AM2022-01-15T09:56:28+5:302022-01-15T09:57:33+5:30

गुगलचे हे ऑफिस कुठे स्थित आहे? १० हजार कर्मचारी काम करू शकणाऱ्या या ऑफिसची वैशिष्ट्ये काय? पाहा, डिटेल्स...

google decided to buy its rented london office central saint giles know the key features | रेंटवर घेतलेली जागा Google साठी ठरतेय लकी! आता १ अब्ज डॉलरला विकतच घेणार; जाणून घ्या

रेंटवर घेतलेली जागा Google साठी ठरतेय लकी! आता १ अब्ज डॉलरला विकतच घेणार; जाणून घ्या

नवी दिल्ली: जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन म्हणून नावलौकिक असलेली Google कंपनी आपला सर्व कारभार रेंटवर म्हणजेच भाड्याने घेतलेल्या जागेत ऑफिस थाटून करते. मात्र, एके ठिकाणी भाड्याने घेतलेली ऑफिसची जागा गुगलसाठी लकी ठरत असल्याचे सांगितले जात असून, गुगल कंपनीला ही जागा इतकी आवडली आहे की, आता थेट ही जागाच गुगल कंपनी विकत घेणार आहे. इतकेच नव्हे तर हा व्यवहार तब्बल १ अब्ज डॉलर म्हणजेच ७४०० कोटी रुपयांना होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल लंडन येथे असलेल्या सेंट्रल सेंट गिल्स या ठिकाणी गुगल रेंटवर घेतलेल्या जागेत ऑफिस चालवते. हे ऑफिस ब्रिटनमधील विकास आणि यशासाठी कंपनी कटिबद्ध आहे. यासाठी सेंट्रल सेंट गिल्स या ठिकाणी असलेली ऑफिसची जागा खरेदी करण्यासाठी कंपनी उत्साहित आहे, अशा अर्थाचे ट्विट सुंदर पिचाई यांनी केल्याचे सांगितले जात आहे. 

भविष्यातील योजनांसाठी मोठी गुंतवणूक

गुगल कंपनी भविष्यातील काही योजनांसाठी ही गुंतवणूक करत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच गुगल लंडनमध्ये एक मुख्यालयही साकारत आहे. याचे नाव द लँडस्क्रॅपर असल्याचे म्हटले जात आहे. ११ मजली या इमारतीत स्वीमिंग पूल, इंडोर बास्केट बॉल कोर्ट यांसह अनेक सोयी-सुविधांनी सुसज्ज गोष्टी दिल्या जाणार आहेत. इतकेच नव्हे तर मसाज रुम आणि रुफ गार्डनची सुविधाही दिली जाणार आहे. 

१० हजार कर्मचाऱ्यांना सामावून घेणारे ऑफिस

लंडनमधील गुगलचे ऑफिस अतिशय आकर्षक रंगांमध्ये सजवण्यात आले आहे. ३८ हजार वर्ग मीटरवर पसरलेल्या या ऑफिसमध्ये सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याची क्षमता आहे. आताच्या घडीला या ऑफिसमध्ये ६ हजार ४०० कर्मचारी काम करतात. या ऑफिसमध्ये रेस्टॉरंट आणि कॅफेही असणार आहे. तसेच ऑफिसच्या जागेतच १०० हून अधिक रेसिडेंशिय अपार्टमेंट असल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: google decided to buy its rented london office central saint giles know the key features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.