lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर! 999 रुपयांत करा विमान प्रवास...

खूशखबर! 999 रुपयांत करा विमान प्रवास...

विमान प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. AirAsia विमान कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी एक सेल आणला आहे. फेस्टिव्ह सेलच्या माध्यमातून कंपनी अवघ्या 999 रुपयांमध्ये विमान प्रवास करण्याची संधी देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 10:03 AM2019-01-09T10:03:21+5:302019-01-09T10:04:09+5:30

विमान प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. AirAsia विमान कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी एक सेल आणला आहे. फेस्टिव्ह सेलच्या माध्यमातून कंपनी अवघ्या 999 रुपयांमध्ये विमान प्रवास करण्याची संधी देत आहे.

Good news! AirAsia offers domestic flight tickets from Rs 999 | खूशखबर! 999 रुपयांत करा विमान प्रवास...

खूशखबर! 999 रुपयांत करा विमान प्रवास...

नवी दिल्ली : विमान प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. AirAsia विमान कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी एक सेल आणला आहे. फेस्टिव्ह सेलच्या माध्यमातून कंपनी अवघ्या 999 रुपयांमध्ये विमान प्रवास करण्याची संधी देत आहे. या फेस्टिव्ह सेल अंतर्गत 999 रुपयांत डोमेस्टिक विमानप्रवास करू शकणार आहात. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आपल्याला फक्त 2,999 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, हा प्रवास तुम्हाला 21 जानेवारी ते जुलैपर्यंत करावा लागणार आहे. 

AirAsia ने आपल्या बेवसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही AirAsiaच्या वेबसाइट आणि अॅपवरुन तिकिट बुकिंग करु शकता. जे प्रवाशी कंपनीचे बिग मेंबर आहेत. ते बिग पॉईंट्सला रिडीम करुन तिकिट बुक करु शकतात. या सेलची ऑफर जगभरातील 130 शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी आहे. ज्यामध्ये क्वालालंपूर, बँकॉक, सिडनी, ऑस्ट्रेलिया, ऑकलँड, मेलबर्न, सिंगापूर, बाली यासारख्या शहरांचा समावेश आहे. तर, डोमेस्टिक विमानप्रवासाठी 19 शहरांमध्ये डिस्कॉउंट ऑफर मिळत आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरु, कोलकाता, हैदराबाद, श्रीनगर, कोच्ची, गोवा, जयपूर, गुवाहाटी, इंफाळ, चंदीगड, पुणे, विशाखापट्टनम, बागडोहडा, रांची, भुवनेश्वर, इंदोर, चेन्नई या शहरांचा समावेश आहे.

सध्या AirAsia कंपनीची 165 ठिकांनी विमान सर्व्हिस आहे. यामध्ये डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय शहरांचा समावेश आहे. दरम्यान, प्रवाशांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने विमान कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्सची बरसात करत आहेत. प्रवाशांची संख्या आणि विमान कंपन्यांकडून सतत येत असलेल्या विशेष ऑफर्स. यामुळे विमानप्रवास स्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Good news! AirAsia offers domestic flight tickets from Rs 999

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.