lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Rate Today : सोने पुन्हा एकदा महागले, जाणून घ्या दर

Gold Rate Today : सोने पुन्हा एकदा महागले, जाणून घ्या दर

गेल्या महिन्यात भारतातील सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 12:01 PM2020-09-03T12:01:12+5:302020-09-03T12:09:07+5:30

गेल्या महिन्यात भारतातील सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले.

gold silver price today news update in hindi gold silver mcx prices | Gold Rate Today : सोने पुन्हा एकदा महागले, जाणून घ्या दर

Gold Rate Today : सोने पुन्हा एकदा महागले, जाणून घ्या दर

मागील सत्रात जोरदार घसरण झाल्यानंतर आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. एमसीएक्सवरील ऑक्टोबरचा वायदा बाजाराचा दर 0.23 टक्क्यांनी वाढून 50,940 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा वायदा दर 0.75 टक्क्यांनी वाढून 68,770 रुपये प्रति किलो झाला.
गेल्या दोन दिवसांपासून धातूच्या मौल्यवान किमती कमी होत आहेत. बुधवारी सोन्याचा वायदा दर दहा ग्रॅम 650 रुपयांनी घसरला, तर चांदी 2,650 रुपये प्रतिकिलो खाली आली. गेल्या महिन्यात भारतातील सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले.

जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेचा सोन्या-चांदीच्या भावावर परिणाम झाला आहे. जागतिक आर्थिक सुधारणांच्या चिंतेच्या दरम्यान स्पॉट सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी वधारून 1,944.58 डॉलर प्रति औंस झाले. बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेच्या खासगी मालकांनी ऑगस्टमध्ये अपेक्षेपेक्षा कमी कामगार ठेवले. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.1 टक्क्यांनी घसरून 27.48 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.1 टक्क्यांनी वाढून 906.69 डॉलर व पॅलेडियम 0.3 टक्क्यांनी घसरून 2,241.10 डॉलरवर बंद झाली.अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यानं सोन्याच्या किमतींवर दबाव आला आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या वेळी सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते.

स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! -
गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार फिजिकल सोन्याची मागणी कमी करण्यासाठी एक खास योजना चालवत आहे. या योजनेला 'सुवर्ण बॉन्ड योजना', असे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा सोनं विकत आहे. सरकार बॉन्डच्या स्वरुपात सोन्याची विक्री करत असते. या सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेकडून निश्चित केली जाते. रिझर्व्ह बँक वेळोवेळी या सोन्याची किंमत जारी करत असते. ही किंमत बाजारातील फिजिकल सोन्याच्या तुलनेत कमी आणि सुरक्षित असते. 

कसा ठरतो सोन्याचा भाव?
डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा कधीच पार केला आहे, तर दुसरीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात  मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात  ठरवण्यात आला.

हेही वाचा

कोरोना संकट अन् GDP घसरगुंडी; सोन्यातील गुंतवणुकीने होईल का 'चांदी'?

भारताच्या मदतीसाठी पाच देश एकवटले; चीन-पाकिस्तान तोंडावर आपटले

India China FaceOff: चीनसोबतचा तणाव वाढला असताना लष्करप्रमुख लडाखमध्ये; परिस्थितीचा आढावा घेणार

कोरोना संकटात ही कंपनी 20 हजार महिलांना देणार रोजगार, दीड लाखांपर्यंत पगार

पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक वेबसाइटचं ट्विटर अकाऊंट हॅक, हॅकर्सकडून बिटकॉइनची मागणी

Web Title: gold silver price today news update in hindi gold silver mcx prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.