lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' कंपनीच्या मोबाईलवर भन्नाट ऑफर, 100 टक्के 'कॅशबॅक'

'या' कंपनीच्या मोबाईलवर भन्नाट ऑफर, 100 टक्के 'कॅशबॅक'

व्हिओ कंपनीच्या पॉलिसीनुसार तुम्हाला 100 टक्के कॅशबॅक ऑफर मिळवण्यासाठी काही नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 09:28 PM2018-10-25T21:28:00+5:302018-10-26T15:36:12+5:30

व्हिओ कंपनीच्या पॉलिसीनुसार तुम्हाला 100 टक्के कॅशबॅक ऑफर मिळवण्यासाठी काही नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत.

False offer on 'this' company, 100% cashback' | 'या' कंपनीच्या मोबाईलवर भन्नाट ऑफर, 100 टक्के 'कॅशबॅक'

'या' कंपनीच्या मोबाईलवर भन्नाट ऑफर, 100 टक्के 'कॅशबॅक'

नवी दिल्ली - दिवाळी सणानिमित्त सर्वच कंपन्यांकडून ऑनलाईन मोबाईल खरेदींवर मोठी सूट देण्यात येत आहे. आता, Vivo V11, V11 Pro, X21, NEX या स्मार्टफोन खरेदीवर 100% कॅशबॅक मिळण्याची संधी ग्राहकांना देण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीकडून तीन प्रकारचा कॅशबॅक ग्राहकांना देण्यात येईल. त्यामुळे मोबाईल खरेदीसाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांना ही मोठी संधी आहे. 

व्हिओ कंपनीच्या पॉलिसीनुसार तुम्हाला 100 टक्के कॅशबॅक ऑफर मिळवण्यासाठी काही नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार व्हिओ कंपनीतर्फे एक स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेत ग्राहकाला भाग घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर, या स्पर्धेतील सहभागी 110 लकी विजेत्यांना या मोबाईलवर 100 टक्के कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. 

11 टक्के कॅशबॅक
कंपनीच्या दुसऱ्या कॅशबॅक ऑफरमध्ये ग्राहकाला 11 टक्क्यांचा कॅशबॅक मिळणार आहे. व्हिओ कंपनीच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक 11 पैकी एका ग्राहकाला हा कॅशबॅक मिळणार आहे. तसेच या दोन्ही लकी ग्राहकांमध्ये जर तुमचा नंबर लागला, तर जी कॅशबॅक ऑफर मोठी आहे. त्यानुसार, 100 टक्के कॅशबॅकचा लाभ ग्राहकाला मिळेल. 

500 रुपये कॅशबॅक
कंपनीने आपल्या सर्वच स्पर्धकांना खुश करण्यासाठी ही तिसरी ऑफर दिली आहे. त्यानुसार, या दोन्ही स्पर्धेत अनलकी ठरलेल्या ग्राहकांना ही 500 रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळेल. म्हणजेच कंपनीतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला हा 500 रुपयांचा कॅशबॅक डिस्काऊंट मिळणार आहे. मात्र, या कॅशबॅकची रक्कम बजाज फिनसर्वश संलग्नीत मोबिक्विक वॉलेटमध्ये जमा होणार आहे. पण, जर तुमच्याकडे वॉलेट नसेल तर, तुमच्या मोबाईलवर एक लिंक पाठविण्यात येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा कॅशबॅक मिळेल. 

Web Title: False offer on 'this' company, 100% cashback'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.