lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFOनं खात्यातून पैसे काढणं अन् वळते करण्याचे नियम बदलले, घसबसल्या अपडेट करा 'Date of Exit'

EPFOनं खात्यातून पैसे काढणं अन् वळते करण्याचे नियम बदलले, घसबसल्या अपडेट करा 'Date of Exit'

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO-Employees Provident Fund Organization,)नं नोकरदारांना दिलासा देत मोठे नियम शिथिल केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 03:03 PM2020-02-12T15:03:35+5:302020-02-12T15:22:43+5:30

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO-Employees Provident Fund Organization,)नं नोकरदारांना दिलासा देत मोठे नियम शिथिल केले आहेत.

EPFO has changed account withdrawal and reversal rules | EPFOनं खात्यातून पैसे काढणं अन् वळते करण्याचे नियम बदलले, घसबसल्या अपडेट करा 'Date of Exit'

EPFOनं खात्यातून पैसे काढणं अन् वळते करण्याचे नियम बदलले, घसबसल्या अपडेट करा 'Date of Exit'

नवी दिल्लीः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO-Employees Provident Fund Organization,)नं नोकरदारांना दिलासा देत मोठे नियम शिथिल केले आहेत. ईपीएफओद्वारे ट्विटरवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ईपीएफओनं नियमावली आणखी सोपी केली आहे. पहिल्यांदा नोकरी सोडण्याची तारीख (Now Employee's can also update their Date of exit) ठरलेली नसल्यानं पैसे काढणे आणि वळते करण्यास अडचणी येत होत्या. आता EPFOनं नोकरदारांना त्रासापासून मुक्त होण्यासाठी युनिफाइड पोर्टल (UAN Portal)वर नवी सुविधा सुरू केली आहे. या सुविधेंतर्गत कर्मचारी मागची कंपनी सोडण्याची तारीख स्वतः अपडेट करू शकणार आहेत. जेव्हा कोणतीही व्यक्ती नोकरी करण्यास सुरुवात करते, त्यावेळी संबंधित व्यक्तीच्या बेसिक पगारातून 12 टक्के पैसे कापले जातात. एवढंच योगदान कंपनीकडून दिलं जातं. व्यक्तीच्या पगारातून 12 टक्के निधी कंपनीद्वारे ईपीएफमध्ये जमा केला जातो. कंपनीकडून 3.67 टक्के योगदान दिलं जातं आणि 8.33 टक्के योगदान हे कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ईपीएसमध्ये जमा केले जातात.

  

  • आता स्वतःला नमूद करता येणार नोकरी सोडण्याची तारीख- EPFOनं नोकरदारांची त्रासापासून मुक्तता करण्यासाठी युनिफाइड पोर्टल (UAN Portal)वर नवी ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेंतर्गत कर्मचारी मागच्या कंपनीला सोडण्याची तारीख स्वतः अपडेट करू शकणार आहेत. म्हणजेच  ईपीएफओच्या रेकॉर्डला त्यानं कंपनीला केव्हा सोडलं हे तात्काळ अपडेट होणार आहे. 
     
  • हा नियम बदलल्यानं काय होणार- तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नोकरी सोडण्याची तारीख ज्या कंपनीत काम करतो ती कंपनीच अपडेट करू शकणार आहे. तर ईपीएफओच्या रेकॉर्डला नोकरी सोडल्याची तारीख अपडेट नसल्यास खातेधारकाला पैसे काढता येणार नाहीत. 
  • ऑनलाइन EPFOमध्ये कसे भराल Exit Date 

>>सर्वात आधी युनिवर्सल अकाउंट नंबर (यूएएन), पासवर्ड आणि कॅप्‍चा कोड टाकून ई-सेवा पोर्टलवर लॉग-इन करावं लागणार आहे. परंतु त्यासाठी तुमचा यूएएन नंबरही सक्रिय हवा. 
>>लॉगइन केल्यानंतर मॅनेज टॅबवर क्लिक करा. त्यानंतर 'मार्क एक्झिट' बटण दाबा. असं केल्यानंतर स्क्रीनवर नवा टॅब उघडेल. एम्‍प्‍लॉयर (नोकरी करत असलेली कंपनी) आणि त्या ईपीएफ अकाउंटवर क्लिक करा, जिथे तुम्हाला Exit Date भरायची आहे. कंपनीनं दिलेल्या शेवटच्या योगदानानंतर तारीख दोन महिन्यांनीच अपडेट करता येणार आहे. Exit Date टाकताना शेवटचं योगदान दिलेली तारीख टाकता येऊ शकते. तसेच नोकरी सोडण्याची तारीख आणि कारण द्यावं लागणार आहे. 
>>त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी येणार आहे. तो वन-टाइम पासवर्ड ओटीपी बॉक्समध्ये टाकावा लागणार आहे. अपडेटवर क्लिक केल्यानंतर ओके बटण दाबा. त्यानंतर ईपीएफओ रेकॉर्डला Exit Date दिसेल. Exit Date अपडेट झाली की नाही ते पाहण्यासाठी सदस्याला ई-सेवा पोर्टलवर लॉग इन करावं लागणार आहे. 
>>त्यानंतर 'व्‍यू' टॅबवर क्लिक करून सर्व्हिस हिस्ट्रीवर सिलेक्ट करावं लागणार आहे. आपल्या स्क्रीनवर नवा टॅब उघडणार आहे. यात जॉइनिंग तारीख, ईपीएफची एक्झिट तारीख आणि इतर माहिती मिळणार आहे. 

Web Title: EPFO has changed account withdrawal and reversal rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.