lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > SIP Return: 5 वर्षांत 3 लाखांचे झाले 11 लाख; SIP मध्ये गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

SIP Return: 5 वर्षांत 3 लाखांचे झाले 11 लाख; SIP मध्ये गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

SIP Investment: Mutual Funds मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सुरक्षित आणि उत्तम पर्याय म्हणजे सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (SIP)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 05:33 PM2021-03-04T17:33:28+5:302021-03-04T17:35:46+5:30

SIP Investment: Mutual Funds मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सुरक्षित आणि उत्तम पर्याय म्हणजे सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (SIP)

best sip return in last 5 years how to start sip and its benefits invest in equity through mutual fund | SIP Return: 5 वर्षांत 3 लाखांचे झाले 11 लाख; SIP मध्ये गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

SIP Return: 5 वर्षांत 3 लाखांचे झाले 11 लाख; SIP मध्ये गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Highlightsअनेक म्युच्युअल फंड स्कीमनं पाच वर्षात दिले मोठे रिटर्न्सअनेक ठिकाणी १०० ते ५०० रूपयांपासून गुंतवणूक करण्याचे मिळतात पर्याय

How to Start SIP: शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर म्युच्युअल फंड्समधील रिटर्न्स हे अधिक चांगले होऊ लागले आहे. लॉकडाऊन नंतर इक्विटी फंड्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. यानंतर तज्ज्ञ पुन्हा एकदा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यास सकारात्मक झाले आहेत. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा एक उत्तम पर्याय म्हणजे एसआयपी. एसआयपीमध्ये आपला पैसे एकाच वेळी जमा करण्याऐवजी प्रत्येक महिन्याला थोडी रक्कम जमा करणं हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

यामध्ये वेळोवेळी आपल्या गुंतवणूकीची माहिती घेऊन एसआयपीची रक्कम वाढवताही येते. एसआयपीमध्ये दीर्घ कालावध्ये मिळणारा परतावा हा तितकाच अधिक असतो. बाजारात सध्या अशाही एसाआयपी उपलब्ध आहेत. ज्यात गुंतवणूकदार 100-500 रूपयांपासूनही गुंतवणूक सुरू करू शकतो. बाजारात असे अनेक म्युच्युअल फंड स्किम आहेत ज्यांनी गेल्या 5 वर्षात 15 ते 25 टक्क्यांच्या हिशोबानं वार्षित रिटर्न दिला आहे.

PGIM इंडिया मिडकैप अपॉर्च्युनिटी फंड
5 वर्षांचा रिटर्न: 25%
5 वर्षांमध्ये 5000 महिन्याला SIP ची व्हॅल्यू: 11 लाख रुपये
(एकूण गुंतवणूक: 3 लाख रुपये)
मिनिमम SIP: 1000 रुपये
एसेट्स: 713 कोटी (31 जानेवारी 2021)
एक्सपेंस रेश्यो: 0.64% (31 जानेवारी 2021)

कोटक स्मालकॅप फंड
5 वर्षांचा रिटर्न: 23%
5 वर्षांमध्ये 5000 महिन्याला SIP ची व्हॅल्यू : 10.54 लाख रुपये
(एकूण गुंतवणूक: 3 लाख रुपये)
मिनिमम SIP: 1000 रुपये
एसेट्स: 2539 कोटी (31 जानेवारी 2021)
एक्सपेंस रेश्यो: 0.60% (31 जानेवारी 2021)

मिरे एसेट्स इमर्जिंग ब्लूचिप
5 वर्षांचा रिटर्न: 23%
5 वर्षांमध्ये 5000 महिन्याला SIP ची व्हॅल्यू: 10.47 लाख रुपये
(एकूण गुंतवणूक : 3 लाख रुपये)
मिनिमम SIP: 1000 रुपये
एसेट्स: 14146 कोटी (31 जानेवारी 2021)
एक्सपेंस रेश्यो: 0.75% (31 जानेवारी 2021)

SBI स्मालकॅप फंड
5 वर्षांचा रिटर्न: 23%
5 वर्षांमध्ये 5000 महिन्याला SIP ची व्हॅल्यू: 10.47 लाख रुपये
(एकूण गुंतवणूक: 3 लाख रुपये)
मिनिमम SIP: 500 रुपये
एसेट्स: 6594 कोटी (31 जानेवारी 2021)
एक्सपेंस रेश्यो: 0.90% (31 जानेवारी 2021)

Axis मिडकॅप फंड
5 वर्षांचा रिटर्न: 23%
5 वर्षांमध्ये 5000 महिन्याला SIP की वैल्यू: 10.44 लाख रुपये
(एकूण गुंतवणूक: 3 लाख रुपये)
मिनिमम SIP: 500 रुपये
एसेट्स: 8608 कोटी (31 जानेवारी 2021)
एक्सपेंस रेश्यो: 0.52% (31 जानेवारी 2021) 

(source: value research)

काय आहेत फायदे?

दरम्यान, एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्या दीर्घ कालावधीसाठी नफाही अधिक मिळण्याची शक्यता असते. दर महिन्याला जमा करणाऱ्या रकमेतून अधिक फायदा होत असेल तर तुम्ही दर महिन्याची रक्कमदेखील वाढवू शकता. बाजार पडल्यानंतर किंवा बाजारात चिंता वाढल्यानंतर एसआयपी पॉझ करण्याची सुविधाही यात मिळते. याव्यतिरिक्त बाजार पुन्हा पूर्वपदावर आल्यावर तुम्ही एसआयपी सुरू करू शकता. 

काय हवी कागदपत्रे ?

एसआयपी सुरू करण्यासाठी केव्हायसी आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड. पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो आणि चेकबुक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त एसआयपी डेबिटसाठी तुम्हाला तुमच्या बॅक खात्याची माहितीही द्यावी लागणार आहे. 

(नोट : या फंड्सची माहिती त्यांच्या कामगिरीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणत्याही फंडात गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: best sip return in last 5 years how to start sip and its benefits invest in equity through mutual fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.