Lokmat Money >बँकिंग > Debit Cards किती प्रकारची असतात माहितीये? पाहा त्यात कोणते मिळतात बेनिफिट्स

Debit Cards किती प्रकारची असतात माहितीये? पाहा त्यात कोणते मिळतात बेनिफिट्स

डिजिटल पेमेंटच्या युगात आजही डेबिट कार्डचं महत्त्व खूप जास्त आहे. याचा वापर पेमेंट करण्यासाठी किंवा रोख रक्कम काढण्यासाठी केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 03:53 PM2023-08-14T15:53:32+5:302023-08-14T15:54:46+5:30

डिजिटल पेमेंटच्या युगात आजही डेबिट कार्डचं महत्त्व खूप जास्त आहे. याचा वापर पेमेंट करण्यासाठी किंवा रोख रक्कम काढण्यासाठी केला जातो.

Do you know how many types of debit cards are there See what are the benefits mastercard visa rupay card | Debit Cards किती प्रकारची असतात माहितीये? पाहा त्यात कोणते मिळतात बेनिफिट्स

Debit Cards किती प्रकारची असतात माहितीये? पाहा त्यात कोणते मिळतात बेनिफिट्स

Meaning of All Debit Card: डिजिटल पेमेंटच्या युगात आजही डेबिट कार्डचं महत्त्व खूप जास्त आहे. याचा वापर पेमेंट करण्यासाठी किंवा रोख रक्कम काढण्यासाठी केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात एटीएम मशीन असल्यानं डेबिट कार्डमधून पैसे काढण्यात लोकांना कोणतीही अडचण येत नाही.

पण तुम्हाला माहितीये का डेबिट कार्डचे किती प्रकार आहेत? वास्तविक निरनिराळ्या डेबिट कार्डांची कामंही निरनिराळी असतात. आजच्या डिजिटल पेमेंटच्या युगात ही सर्व माहिती तुमच्याकडे असायला हवी. तर आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

रुपे डेबिट कार्ड (RuPay Debit Card)
RuPay डेबिट कार्ड मुख्यतः देशांतर्गत व्यवहार आणि रोख पैसे काढण्यासाठी वापरले जाते. हे डेबिट कार्ड नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं जारी केलं आहे. तुम्ही ते ऑनलाइन आणि खरेदीसाठी, तसंच बिलं भरण्यासाठी वापरू शकता.

गोल्ड व्हिसा कार्ड (Gold Visa Card)
या कार्डमध्ये तुम्हाला ग्लोबल कस्टमर असिस्टन्स सर्व्हिसेसचा लाभ मिळतो. हे कार्ड तुम्ही देशाबाहेरही वापरू शकता. तुम्ही हे कार्ड जगभरातील रिटेल, डायनिंग आणि एन्टरटेनमेंट आउटलेटवर वापरता तेव्हा तुम्हाला अनेक ऑफर देखील मिळतात.

मास्टर कार्ड (MasterCard)
स्टँडर्ड डेबिट कार्ड, एन्हांस्ड डेबिट कार्ड आणि वर्ल्ड डेबिट या तीन प्रकारांमध्ये मास्टरकार्ड उपलब्ध आहे. जेव्हा तुम्ही खातं उघडण्यासाठी जाता तेव्हा बँकेकडून तुम्हाला एक स्टँडर्ड डेबिट कार्ड जारी केलं जातं. तुम्ही ते जगभरात वापरू शकता.

क्लासिक डेबिट कार्ड (Classic Debit Card)
क्लासिक कार्ड हे एक बेसिक डेबिट कार्ड आहे. या कार्डमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या ग्राहक सेवा मिळतात. तुम्ही तुमचे कार्ड कधीही बदलू शकता. या कार्डच्या मदतीनं तुम्ही आपात्कालिन परिस्थितीत अॅडव्हान्स्ड कॅशही काढू शकता.

प्लॅटिनम कार्ड (Platinum Card)
तुम्ही हे कार्ड जागतिक स्तरावर देखील वापरू शकता. यामध्ये तुम्हाला कॅश डिस्बर्समेंटपासून ते ग्लोबल एटीएम नेटवर्कपर्यंतच्या सुविधा मिळतात. याव्यतिरिक्त, वैद्यकीय आणि कायदेशीर रेफरर तसंच मदत उपलब्ध आहे. या कार्डद्वारे अनेक प्रकारच्या डील, डिस्काउंट ऑफर आणि इतर सुविधांचा लाभ घेता येतो.

Web Title: Do you know how many types of debit cards are there See what are the benefits mastercard visa rupay card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक