lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Atal Pension Yojana: मस्तच! अटल पेन्शन योजनेतून पती-पत्नी मिळवू शकतात दरमहा १० हजार, जाणून घ्या...

Atal Pension Yojana: मस्तच! अटल पेन्शन योजनेतून पती-पत्नी मिळवू शकतात दरमहा १० हजार, जाणून घ्या...

Atal Pension Yojana: निवृत्तीनंतर आपली आर्थिक गरज कशी पूर्ण होणार? असा प्रश्न जर तुमच्यासमोर उपस्थित झाला असेल तर केंद्र सरकारची एक खास योजना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 05:21 PM2021-07-28T17:21:51+5:302021-07-28T17:23:09+5:30

Atal Pension Yojana: निवृत्तीनंतर आपली आर्थिक गरज कशी पूर्ण होणार? असा प्रश्न जर तुमच्यासमोर उपस्थित झाला असेल तर केंद्र सरकारची एक खास योजना आहे.

Atal Pension Yojana Husband and wife can get Rs 10000 per month here are details | Atal Pension Yojana: मस्तच! अटल पेन्शन योजनेतून पती-पत्नी मिळवू शकतात दरमहा १० हजार, जाणून घ्या...

Atal Pension Yojana: मस्तच! अटल पेन्शन योजनेतून पती-पत्नी मिळवू शकतात दरमहा १० हजार, जाणून घ्या...

Atal Pension Yojana: निवृत्तीनंतर आपली आर्थिक गरज कशी पूर्ण होणार? असा प्रश्न जर तुमच्यासमोर उपस्थित झाला असेल तर केंद्र सरकारची एक खास योजना आहे. अटल पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या पती-पत्नींना पेन्शन स्वरुपात दरमहा १० हजार रुपये मिळू शकतात. यातून तुमच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजेचा प्रश्न सुटू शकतो. 

पती-पत्नी अशा दोघांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त अटल पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशन करावं लागेल. यात पत्नी आणि पत्नी दोघांना यात ५ हजार रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर दोघांनाही निवृत्तीनंतरच्या काळात दरमहा १० हजार रुपयांपर्यंतची पेन्शन मिळवता येणार आहे. पण या योजनेचा लाभ घेणाऱ्या पती-पत्नीचं वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे. या वगोगटातील दाम्पत्यालाच योजनेत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. यासोबत दोघांचंही बँकेत बचत खातं असणार अनिवार्य आहे. 

योजनेचे फायदे कोणते?
>> अटल पेन्शन योजनेअंतर्गत असंघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळतो. 
>> अटल पेन्सन योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला दरमहा कमीत कमी १ हजार ते ५ हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळतात.
>> १८ ते ४० वयोगटातील कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्याचं बँकेत बचत खातं असणं गरजेचं आहे.
>> अटल पेन्शन योजनेतील लाभार्थ्याच्या गुंतवणूकीपैकी ५० टक्के किंवा प्रतिवर्षी १ हजार रुपये यातील जी रक्कम कमी असेल तितका वाटा केंद्राकडूनही लाभ स्वरूपात भरला जातो.
>> सरकारकडून दिलं जाणारं हे कॉन्ट्रीब्युशन आयकर भरणाऱ्या किंवा सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी लागू होत नाही.

Web Title: Atal Pension Yojana Husband and wife can get Rs 10000 per month here are details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.