lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Amazon ने बदलला App आयकॉन; हिटरलच्या मिशांसोबत तुलना करत केलं होतं ट्रोल

Amazon ने बदलला App आयकॉन; हिटरलच्या मिशांसोबत तुलना करत केलं होतं ट्रोल

Amazon : नेटकऱ्यांनी नव्या आयकॉनची हिटलरच्या मिशांशी तुलना करत केलं होतं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 02:16 PM2021-03-03T14:16:19+5:302021-03-03T14:19:17+5:30

Amazon : नेटकऱ्यांनी नव्या आयकॉनची हिटलरच्या मिशांशी तुलना करत केलं होतं ट्रोल

Amazon changes new app icon after Hitler comparison | Amazon ने बदलला App आयकॉन; हिटरलच्या मिशांसोबत तुलना करत केलं होतं ट्रोल

Amazon ने बदलला App आयकॉन; हिटरलच्या मिशांसोबत तुलना करत केलं होतं ट्रोल

Highlightsनेटकऱ्यांनी नव्या आयकॉनची हिटलरच्या मिशांशी तुलना करत केलं होतं ट्रोलजानेवारी महिन्यात कंपनीनं बदलला होता App आयकॉन

ई-कॉमर्स कंपनी Amazon नं आपल्या App चा आयकॉन काही दिवसांपूर्वी बदलला होता. परंतु त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्या आयकॉनवरून Amazon ला ट्रोल केलं. काही नेटकऱ्यांनी त्याची तुलना हिटलरच्या मिशांशी केली होती. त्यानंतर कंपनीनं त्वरित यावर कार्यवाही करत आपला आयकॉन पुन्हा एकदा चेंज केला. फॉक्स टीव्हीच्या वृत्तानुसार हिटलरच्या मिशांशी मिळताजुळता फिडबॅक मिळाल्यानंतर Amazon नं आपल्या अॅप आयकॉनवर असलेल्या निळ्या रिबिनचं डिझाईन पुन्हा बदललं.

कंपनीनं जानेवारी महिन्यात आपला एक नवा अॅप आयकॉन आणला होता. नव्या आयकॉननं त्यानंतर जुन्या आयकॉनची जागा घेतली. यामध्ये Amazon च्या बॉक्सवर वरील बाजूला निळी रिबिन आणि त्याच्या खालच्या बाजूला हसण्याच्या आकारात अॅमेझॉनचा आयकॉन आहे. पाच वर्षांमध्ये Amazon नं पहिल्यांदा यात बदल केला होता. 





परंतु यानंतर काही नेटकऱ्यांनी याची तुलना हिटलरच्या मिशांशी केली. तसंच अनेकांनी सोशल मीडियावर याचा विरोधही करण्यास सुरूवात केली. या नव्या अॅप आयकॉनला अनेकांकडून ट्रोलही करण्यात आलं. परंतु लोकांच्या प्रतिक्रियांनंकर Amazon नं पुन्हा एकदा त्यात बदल केले. "आम्ही नवे आयकॉन डिझाईन केले आहेत. जेव्हा ग्राहक आपल्या फोनवर खरेदी सुरू करतात, ठिक त्याच प्रणामे ते आपल्या दवाज्यावर आपल्या बॉक्सलाही पाहतात," असं Amazon च्या प्रवक्त्यांनी सीएनएनशी बोलताना सांगितलं. 

Web Title: Amazon changes new app icon after Hitler comparison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.