lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel नं सुरू केलं 5G नेटवर्कचं ट्रायल; 1Gbps चा मिळतोय स्पीड

Airtel नं सुरू केलं 5G नेटवर्कचं ट्रायल; 1Gbps चा मिळतोय स्पीड

Airtel 5G Testing : यापूर्वी दूरसंचार विभागानं (DoT) टेलिकॉम कंपन्यांना 5G नेटवर्क चाचणीची दिली होती परवानगी. यानंतर आता एअरटेलकडून चाचणीला सुरूवात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 04:44 PM2021-06-15T16:44:26+5:302021-06-15T16:48:04+5:30

Airtel 5G Testing : यापूर्वी दूरसंचार विभागानं (DoT) टेलिकॉम कंपन्यांना 5G नेटवर्क चाचणीची दिली होती परवानगी. यानंतर आता एअरटेलकडून चाचणीला सुरूवात.

Airtel launches 5G network trial Getting speed of 1Gbps soon reliance jio vodafone idea will start | Airtel नं सुरू केलं 5G नेटवर्कचं ट्रायल; 1Gbps चा मिळतोय स्पीड

Airtel नं सुरू केलं 5G नेटवर्कचं ट्रायल; 1Gbps चा मिळतोय स्पीड

Highlights यापूर्वी दूरसंचार विभागानं (DoT) टेलिकॉम कंपन्यांना 5G नेटवर्क चाचणीची दिली होती परवानगी. यानंतर आता एअरटेलकडून चाचणीला सुरूवात.

भारतात 5G नेटवर्कबाबत काम सुरू करण्यात आलं आहे. सरकारनं 5G स्पेक्ट्रमचा लिलाव केला नसला तरी दूरसंचार विभागानं नुकतेच भारती एअरटेल (Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन-आयडियाला 5G चाचणीसाठी परवानगी दिली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार 3.5 GHz बँडवर चालणाऱ्या Airtel 5G नेटवर्कची गुरुग्रामध्ये चाचणी सुरू करण्यात आली आहे. तसंच एका व्हिडीओमध्ये त्याचा 5G स्पीडही दाखवण्यात आला आहे. 

एअरटेलनं दिलेल्या माहितीनुसार गुरुग्राममधील सायबर हब या परिसरात Airtel 5G ट्रायल नेटवर्क लाईव्ह करण्यात आलं आहे. 91 मोबाईल्सच्या माहितीनुसार हे नेटवर्क 3,500MHz बँडवर ऑपरेट केलं जात आहे. तसंच यात अतिशय चांगला डाऊनलोड स्पीडही मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये 1GBPS पेक्षा अधिक स्पीड मिळत आहे.
एका युझरनं यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये Airtel 5G मध्ये मिळणारा स्पीड दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे Airtel 5G मध्ये सध्या चाचणीदरम्यान स्पीड हा 1GBPS पेक्षा अधिक मिळत आहे. तर अपलोडींग स्पीडही उत्तम मिळत आहे.

एरिक्सन इन्फ्रावर चाचणी
ईटी टेलिकॉमनं दिलेल्या माहितीनुसार Airtel 5G नेटवर्क एरिक्सन इन्फ्रास्ट्रक्चरवर सुरू आहे. येत्या काही महिन्यात अन्य ठिकाणीही एअरटेलच्या 5G नेटवर्कची चाचणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशात 5G नेटवर्क केव्हा लाँच होईल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

Web Title: Airtel launches 5G network trial Getting speed of 1Gbps soon reliance jio vodafone idea will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.