lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानींना मोठा झटका! SBI ने तीन बँक खाती ठरवली 'फ्रॉड'; CBI चौकशी होणार?

अनिल अंबानींना मोठा झटका! SBI ने तीन बँक खाती ठरवली 'फ्रॉड'; CBI चौकशी होणार?

एसबीआयच्या या निर्णयामुळे अनिक अंबानी यांना आगामी काळात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

By मोरेश्वर येरम | Published: January 7, 2021 12:18 PM2021-01-07T12:18:10+5:302021-01-07T12:28:03+5:30

एसबीआयच्या या निर्णयामुळे अनिक अंबानी यांना आगामी काळात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

accounts of Anil Ambanis Reliance Companies Declared Fraud SBI To Delhi High Court | अनिल अंबानींना मोठा झटका! SBI ने तीन बँक खाती ठरवली 'फ्रॉड'; CBI चौकशी होणार?

अनिल अंबानींना मोठा झटका! SBI ने तीन बँक खाती ठरवली 'फ्रॉड'; CBI चौकशी होणार?

Highlightsउद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणींत वाढस्टेट बँकेतील तीन खाती ठरविण्यात आली फ्रॉडअनिल अंबानींना सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागणार?

नवी दिल्ली
रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल या तीन कंपन्यांची बँक खाती 'फ्रॉड खाती' म्हणून घोषीत करण्यात आल्याची माहिती 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने (SBI) दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. या तिन्ही कंपन्यांची मालकी उद्योगपती अनिल अंबानी यांच्याकडे आहे. 

'एसबीआय'चा निर्णय अनील अंबानी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अनिल अंबानींच्या तीन कंपन्यांच्या बँक खात्यांचे ऑडिट केले असता त्यात निधीचा दुरुपयोग, चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण आणि अफरा-तफरी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच तिन्ही खात्यांना 'फ्रॉड' यादीत टाकण्यात आलं आहे, असं बँकेने कोर्टात नमूद केलं आहे.

अनिल अंबानींसमोर अडचणी
एसबीआयच्या या निर्णयामुळे अनिक अंबानी यांना आगामी काळात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. कारण एसबीआयकडून या प्रकरणासाठी फसवणुकीच्या आरोपाखाली कोर्टात सीबीआय चौकशीची मागणी केली जाऊ शकते. 

एखाद्या कंपनीचं बँक खातं हे फ्रॉड खातं तेव्हाच घोषीत केलं जातं जेव्हा ते अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) खातं होतं. नियमानुसार फ्रॉड खातं जाहीर झाल्याच्या याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देणं गरजेचं असतं. जर त्या खात्यातून झालेली फसवणूक ही १ कोटींपेक्षा अधिक रकमेची असेल तर 'आरबीआय'ने सूचना दिल्याच्या ३० दिवासांच्या आत त्याबाबत सीबीआयकडे गुन्ह्याची नोंद करण्यात येते. 

सुत्रांच्या माहितीनुसार अनिल अंबानी यांच्या तिन्ही कंपन्यांची स्टेट बँकेकडे ४९ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात रिलायन्स इन्फ्राटेलच्या १२ हजार कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे. तर रिलायन्स टेलिकॉमने २४ हजार कोटी थकवले आहेत. 
 

Web Title: accounts of Anil Ambanis Reliance Companies Declared Fraud SBI To Delhi High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.