ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली नदीपार; ट्रॅक्टरने नदी पार करून दिव्यांगाचे मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 05:36 PM2024-04-23T17:36:54+5:302024-04-23T17:38:45+5:30

लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना पहिल्यांदा घरपोच मतदान सुरू झाले आहे.

lok sabha lection 2024 a polling station team rached to the voters of konti village in khamgaon district by crossing the river with the help of tractor in buldhana | ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली नदीपार; ट्रॅक्टरने नदी पार करून दिव्यांगाचे मतदान

ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली नदीपार; ट्रॅक्टरने नदी पार करून दिव्यांगाचे मतदान

खामगाव : लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना पहिल्यांदा घरपोच मतदान सुरू झाले आहे. त्यानुसार, खामगाव तालुक्यातील अतिदुर्गम आणि वनांच्छादित असलेल्या कोंटी या गावातील दिव्यांगासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नदी पार करून मतदान केंद्र पथक रविवारी पोहोचले. त्यांनी मतदानही केले.

दिव्यांग व वृद्ध मतदारांना सन्मानाने मतदान करता यावे, यासाठी घरपोच मतदानाची सुविधा सुरू झाली. त्याची सुरुवात खामगावातून २१ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून सुरू करण्यात आली. विविध चमूंकडून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. खामगाव तालुक्यातील काही दुर्गम गावांमध्ये जाण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. त्यामध्ये अतिदुर्गम आणि वनांच्छादित असलेल्या कोंटी गावात पथक पाेहोचले. यावेळी मायक्रो ऑब्झरर्वर सचिन क्षीरसागर, पोकॉ.उमेश इंगळे, गावचे केंद्रस्तरीय अधिकारी रामकृष्ण पानझडे यांनी गोपीचंद सदाशिव मोहिते (८६) यांना घरपोच मतदान करण्याचा हक्क मिळवून दिला.

खामगाव मतदार संघात खामगाव व शेगाव तालुके आहेत. त्यामध्ये १२० ज्येष्ठ नागरिक, ८३ दिव्यांग असे २०३ मतदार आहेत. मतदारांसाठी २३ एप्रिलच्या दरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात त्यासाठी एकूण १० पथके तयार करण्यात आली आहेत. सोमवारी उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांच्या उपस्थितीत सप्तशृंगी अपार्टमेंट खामगाव येथील शुभदा चिंतामण खेरडे नामक दिव्यांग महिलेने मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी पुरी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पोस्टल टपाली नोडल अधिकारी तथा नायब तहसीलदार विजय पाटील, ज्येष्ठ नागरिकाचे पोस्टल मतदान चमू क्रमांक ५ पथकातील केंद्रस्तरीय  अधिकारी जयेश जैन, राहुल पाठक, मायक्रोऑब्झर्वर नामदेव झांबरे, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: lok sabha lection 2024 a polling station team rached to the voters of konti village in khamgaon district by crossing the river with the help of tractor in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.