बुलडाण्यात मॉकपोलवरच झाले प्रत्यक्ष मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:02 IST2019-04-20T05:00:05+5:302019-04-20T05:02:43+5:30
बुलडाणा मतदारसंघातील डोणगाव केंद्रावर प्रात्यक्षिक दाखवतानाच (मॉक पोल) प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा प्रकार गुरूवारी घडला.

बुलडाण्यात मॉकपोलवरच झाले प्रत्यक्ष मतदान
बुलडाणा : बुलडाणा मतदारसंघातील डोणगाव केंद्रावर प्रात्यक्षिक दाखवतानाच (मॉक पोल) प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा प्रकार गुरूवारी घडला. या प्रकरणी निवडणूक आयोगाने अहवाल मागितला आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होण्याआधी कर्मचारी व प्रतिनिधींसाठी प्रात्यक्षिक घेतले जाते. त्यास मॉक पोल असे म्हणतात. मात्र डोणगावच्या१२० क्रमांकाच्या केंद्रावर मॉकपोलवरच प्रत्यक्ष मतदान झाले.
चूक लक्षात आल्यानंतर मशीन पुन्हा सुरू करून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. ज्या मतदारांनी मॉक पोलमध्ये मतदान केले होते, त्यांच्याकडून पुन्हा प्रत्यक्ष मतदानही करून घेण्यात आले. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी याची छाननी करीत असून, त्यानंतर आयोगाला अहवाल पाठविणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी सांगितले. मात्र या मतदान केंद्रावरील सर्वांनी असे घडले नसल्याचे सांगितले.