गणेश विसर्जन मिरणुकांवर राहणार सीसी कॅमेऱ्याचा ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 03:44 PM2019-09-06T15:44:24+5:302019-09-06T15:44:54+5:30

विसर्जन मिरवणुका या पूर्णत: सीसी कॅमेºयात कैद करण्याचा निर्णय बुलडाणा पोलीस दलाने घेतला आहे.

CC camera 'watch' on Ganesh immersion procession | गणेश विसर्जन मिरणुकांवर राहणार सीसी कॅमेऱ्याचा ‘वॉच’!

गणेश विसर्जन मिरणुकांवर राहणार सीसी कॅमेऱ्याचा ‘वॉच’!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोणातून संवेदनशील व अतिसंवेदनशील शहरांमधील विसर्जन मिरवणुका या पूर्णत: सीसी कॅमेºयात कैद करण्याचा निर्णय बुलडाणा पोलीस दलाने घेतला आहे. यासोबत या कालावधीत ड्रोन कॅमेºयाचीही मिरवणुकीवर नजर राहणार असून, चौका-चौकात त्याचे लाइव्ह प्रक्षेपण करण्याच्या मानसिकतेत पोलीस प्रशासन आले आहे. दरम्यान, त्या दृष्टिकोणातून संवेदनशील शहरांतील पालिकांनाही अनुषंगिक खर्च करण्याच्या दृष्टिकोणातून जिल्हाधिकारी कार्यालयाने सुट द्यावी, अशा आशयाचे पत्रच दिले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले आहे.
सोमवारी मोठ्या हर्षोल्हासात गणरायाचे जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्यात ९०६ मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरी भागात ३५८ व ग्रामीण भागात ५४८ मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था दोन महिन्यांपूर्वीपासूनच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी प्रतिबंधक कारवाईचा कृती आराखडा तयार केला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यातील पाच हजार व्यक्तींवर पोलिसांची नजर असतानाच पोलीस प्रशासनाकडून संवेदनशील शहरामधील मिरवणुकांवर थेट सीसी कॅमेºयाद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील भाग असलेल्या खामगाव, मलकापूर व जळगाव जामोद येथील मिरवणुकांवरही सीसी कॅमेºयाची नजर राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. 


ड्रोनची ही नजर!
गणेश विसर्जन मिरवणुकीवर सीसी कॅमेºयाची नजर राहणार असून, या कॅमेºयाच्या जोडीला ड्रोनही राहणार आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचीही पोलिसांनी बारकाईने पाहणी केली असून, संभाव्य आपतकालीन स्थिती पाहता उपाययोजनांचीही उजळणी केली आहे. यासाठी पालिकांकडूनही योग्य ते सहकार्य राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: CC camera 'watch' on Ganesh immersion procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.