'त्या' निर्वस्त्र महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2022 12:17 IST2022-08-05T12:15:05+5:302022-08-05T12:17:01+5:30

पीडितेचा जीवन- मृत्यूशी संघर्ष

Woman Gang Raped And Thrown Naked In The Forest, Two Suspects Arrested By Police | 'त्या' निर्वस्त्र महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

'त्या' निर्वस्त्र महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

भंडारा : राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला कन्हाळमोह येथे बेशुद्धावस्थेत निर्वस्त्र आढळलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचे पुढे आले. याप्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दोन संशयितांना ताब्यात घेतले.

गोंदिया जिल्ह्यातील एक ३५ वर्षिय महिला राष्ट्रीय महामार्गालगत कन्हाळमोह येथे मंगळवारी निर्वस्त्र व बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. या घटनेची माहिती होताच कारधा पोलिसांनी तिला तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पोलिसांच्या तपासात आणि वैद्यकीय अहवालात तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे पुढे आले. महिलेची प्रकृती बिघडल्यामुळे तिला नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता श्रीराम उरकुडे (४५) रा.गोरेगाव याने तिला थाप मारून सोबत नेले. तसेच एका दुसऱ्या व्यक्तीनेही तिच्यावर अत्याचार करून सोडून दिल्याचे पुढे आले. त्यावरून श्रीरामसह आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Woman Gang Raped And Thrown Naked In The Forest, Two Suspects Arrested By Police